नाशिक: समाजातील माणुसकी कमी होत असल्याच्या घटना आपल्याला वारंवार पाहायला मिळत आहेत. माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नाशिक शहरात दोन दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास घडली आहे. भूकेने व्याकूळ झालेल्या भीक मागणाऱ्या दिव्यांग मुलानं खाण्यासाठी अन्न मागितले असता रागवलेल्या हॉटेल चालकानं त्याच्या अंगावर गरम पाणी ओतलं आहे. या घटनेत मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ( Hotel owner throw hot water on differently abled beggar boy)
दिव्यांग मुलगा भीक मागून पोटाची भूक भागवत असतो. सोमवारी रात्रीच्या सुमारास तो शहरातील एका हॉटेलमध्ये खाण्यासाठी जेवण मागण्यासाठी गेला. यामुळे राग आलेल्या हॉटेल चालकानं त्याच्या अंगावर गरम पाणी ओतलं. या घटनेमध्ये दिव्यांग मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ( Hotel owner throw hot water on differently abled beggar boy)
मुलाच्या अंगावर गरम पाणी ओतल्याची माहिती मिळताच शहरातील सामाजिक संघटना त्याच्या मदतीला धाऊन आल्या. जखमी झालेल्या मुलाला जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. अश्विनी आढाव आणि सुशील जाधव हे सामाजिक कार्यकर्ते त्या दिव्यांग मुलाच्या मदतीला धावून आले. सामाजिक कार्यकर्त्यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात हॉटेल चालकाविरोधात तक्रार दाखल केली आहे.
भीक मागून पोटाची भूक भागवणाऱ्या मुलाच्या अंगावर उकळत पाणी फेकल्याची घटना, माणुसकीला काळिमा फासणारी आहे. समाजातील माणुसकी संपत चालल्याचे हे लक्षण आहे, असं सामाजिक कार्यकर्त्या अश्विनी आढाव म्हणाल्या. या घटनेतील आरोपींवर कारवाई करुन तातडीनं न्याय देण्याची मागणीही त्यांनी केली. ( Hotel owner throw hot water on differently abled beggar boy)
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 9 December 2020https://t.co/CPEIwKCbGx #Maharashtra #mahafast
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 9, 2020
संबंधित बातम्या :
किरकोळ वादातून तरुणाच्या अंगावर कार घालून हत्या, तीन तासात आरोपींना बेड्या
नाशिक शहर आणि जिल्ह्यातील ५ महत्वपूर्ण घडामोडी
किरकोळ वादातून तरुणाच्या अंगावर गाडी घालून हत्या, पोलिसांनी तीन तासात आरोपींना ठोकल्या बेड्या
( Hotel owner throw hot water on differently abled beggar boy)