नाशिक : नाशिकमधील (Nashik) म्हसरूळ (Masrul) येथील म्हसोबावाडी (Masobawadi) परिसरात विकास प्रकाश खरात यांच्या घराला अचानक आग लागली. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. ही घटना आज दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास घडली. आगीत चार घरांमधील साहित्य जळाले आहे. स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेने त्वरित आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच पंचवटी येथील अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेत संसारोपयोगी वस्तू जळून खाक झाल्या असून, घरांचे मोठे नुकसान झाले असल्याची समजली आहे.