पुण्यात चक्क बिर्याणी चोर ! भूक भागवण्यासाठी फोडलं हॉटेल पण..

| Updated on: Jan 15, 2025 | 12:33 PM

पुण्यातील मुळशी येथील एका प्रसिद्ध बिर्याणी हॉटेलमध्ये रात्री चोरी झाली. भूक भागवण्यासाठी आलेले चोरटे बिर्याणी शोधत होते. मात्र, बिर्याणी न मिळाल्याने त्यांनी चिकन लॉलीपॉप आणि थोडीशी रोख रक्कम चोरून पळ काढला. ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

पुण्यात चक्क बिर्याणी चोर ! भूक भागवण्यासाठी फोडलं हॉटेल पण..
पुण्यात बिर्याणी चोर
Follow us on

जगभरात काही ना काही विचित्र घटना घडत असतात,कधी एखादी गोष्ट ऐकून आपल्याला हसू फुटतं तर कधी आपण अशी एखादी घटना ऐकतो, ज्यामुळे हैराण होतो आणि कपाळावर हात मारून घेतो. पुणं हे राज्यातलं एक महत्वाचं आणि तितकंच प्रसिद्ध शहर आहे. पुणेरी पाट्या तर फेमस आहेतच, पण तेवढीच पुण्यातील माणसंही फेमस आहेत आणि अतंरगींही . ते कमी की काय म्हणून आता पुण्यातले चोरही तसेच अतरंगी निघाले आहेत. पुण्यात चोरीची एक अशी घटना घडली आहे, ज्या बद्दल तुम्ही वाचलंत तर तुम्हीही हैराण व्हाल आणि नक्की म्हणाले पुणे तिथे काय उणे ?

पुण्यात चक्क बिर्याणी चोर!

पुण्यात चक्क बिर्याणी चोर दिसले आहेत. पुणे जिल्ह्यातील मुळशी भागातील एका प्रसिद्ध बिर्याणी हॉटेलवर चोरट्यांनी डल्ला मारला. बिर्याणी खाण्यासाठी आलेले चोरटे सीसीटिव्हीमध्ये कैद झाले. भूक भागवण्यासाठी त्यांनी हॉटेल फोडल्याचंही समोर आलं.

नक्की काय झालं ?

पुणे जिल्ह्यातील मुळशी भागात एक हॉटेल आहे जिथे बिर्याणी खूप प्रसिद्ध आहे. दोन ते तीन चोरट्यांनी पहाटेच्या वेळी या हॉटेलचे शटर तोडले आणि आत प्रवेश केला. बिर्याणी खाण्यासाठी चोरट्यांनी थेट हॉटेलच्या किचन मध्ये प्रवेश केला. आणि कुठे बिर्याणी मळते का हे पाहत त्यांनी प्रत्येक भांड्यात शोधाशोध सुरू केली. हॉटेलमधल्या सगळ्या भांड्यांची उचकापाचक केली. भुकेने कळवळलेल्या या चोरट्यांनी, तिघांनी तोंडाला मास्क लावून संपूर्ण किचन शब्दशः उचकले पण त्यांना एकाही भांड्यात बिर्याणीचा एक घास सुद्धा मिळाला नाही. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. पण कुठेच बिर्याणी न मिळाल्यामुळे चोरट्यांनी हॉटेल मधील चिकन लॉलीपॉप चोरलं आणि यावर ताव मारला. एवढंच नव्हे तर त्यांनी हॉटेलमधील तीस रुपयाची चिल्लर चोरली व कोल्ड्रिंक्स पिऊन पळ काढला.