नाशिक : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात (Civil Hospital) एका बंटी-बबलीने धिंगाणा घालत तोडफोड केल्याचे समोर आले आहे. ह्या बंटी-बबलीला एका फसवणुकीच्या गुन्ह्यात (Crime) वैद्यकीय चाचणी करण्यासाठी पोलीसांनी जिल्हा रुग्णालयात नेले होते. याच दरम्यान बंटी-बबलीने पोलीसांशी हुज्जत घालत रुग्णालयात धिंगाणा केला. बंटी-बबली इथेच थांबले नाही त्यांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराची आणि केसपेपर कक्षाची काच फोडली आहे. बंटी-बबलीचा हा धिंगाणा जिल्हा रुग्णालयाच्या सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. त्यावरून सरकारवाडा पोलिसांनी (Nashik Police) बंटी बबलीवर आणखी एक गुन्हा दाखल केला आहे.
बंटी-बबलीवर आता सरकारी कामात अडथळा, सरकारी मालमत्तेचे नुकसान केले म्हणून सरकारवाडा पोलीसांत आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
योगेश उर्फ म्हसोबा दत्तू क्षीरसागर, अनिता क्षीरसागर असे दोघांचे नाव असून नाशिकच्या पंचवटी परिसरातील कुमावतनगर येथे ते राहतात.
औरंगाबाद येथील मोहिज फिदारी यांना सात लाखांचे 23 लाख करून देतो म्हणून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिदारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून बंटी-बबलीलावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता, अटक करण्यापूर्वी पोलीसांनी मेडिकल करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात नेले होते.
फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली जाणार असे लक्षात येतात बंटी-बबलीने पोलीसांना धक्काबुक्की, शिवीगाळ करीत आत्महत्या करण्याची धमकी दिली होती.
त्याचवेळी पोलीसांशी हुज्जत घालत त्यांनी रुग्णालयाच्या काचा फोडल्या होत्या, हा सर्वप्रकार रुग्णालयातील सिसिटीव्हीत कैद झाल्याने बंटी-बबली विरोधात पोलीसांना एक सबळ पुरावा मिळाला आहे.
सरकारी कामात अडथळा आणणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान असे आणखी दोन गुन्हे त्यांच्यावर पोलीसांनी दाखल केले आहे. त्यामुळे क्षीरसागर दाम्पत्याच्या अडचणीत वाढ झाली आहे.