हुंडा प्रकरण कोर्टात पोहोचलं, सुनावणीपूर्वी पत्नीने पतीला सगळ्यांसमोर चोपला

| Updated on: Sep 22, 2023 | 7:04 PM

नवरा आणि बायको सुनावणीसाठी कोर्टात आले होते. त्यावेळी दोघांच्यात तिथं वाद झाला, पत्नीने पतीला चप्पल आणि लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण केली. एक वर्षापूर्वी हुंडा प्रकरण कोर्टात आलं आहे.

हुंडा प्रकरण कोर्टात पोहोचलं, सुनावणीपूर्वी पत्नीने पतीला सगळ्यांसमोर चोपला
bihar crime news
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बिहार : राज्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर (VIDEO) चांगलाचं व्हायरल झाला आहे. कोर्टात ज्यावेळी पत्नी आणि तिचे वडील पोहोचले. त्यावेळी दोघांनी मिळून नवऱ्याला बेदम मारहाण करीत असल्याचं व्हिडीओ (TRENDING VIDEO) स्पष्ट दिसत आहे. इतकं कडाक्याचं भांडण सुरु होत की, लोक एका जागी उभा राहून पाहत होती. नवऱ्यावरती चिडलेली पत्नी सगळ्यांच्या समोर चप्पलने मारहाण करीत होती. तिथं असलेल्या लोकांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यावेळी लोकांनी या दोघांना वेगळं केलं असल्याची माहिती मिळाली आहे. दोन्ही बाजूच्या लोकांनी त्या पतीला आणि पतीला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ज्यावेळी पत्नी शांत झाली. त्यावेळी पतीला तिथून वकिलांनी (CRIME NEWS IN MARATHI) बाहेर काढला.

दोघांचं एक वर्षापूर्वी त्या दोघांचं लग्न झालं आहे. त्याचबरोबर दोघांमध्ये वारंवार होत होता. ज्यावेळी हे प्रकरण कोर्टात आलं त्यावेळी पत्नीने मात्र सगळ्यांच्यासमोर पतील बेदम मारहाण केल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

एकवर्षापूर्वी झाली होतं लग्न

हे सुद्धा वाचा

अंजू कुमारी असं पत्नीचं नावं आहे. त्यावेळी दोघांच्यात वाद झाला, त्यावेळी पत्नी माहेरी गेली. त्यानंतर नवऱ्याने हुंडा मागितल्याचा आरोप पत्नीने केला आहे. सासरकडच्या लोकांनी लग्नात दोन लाख रुपये रोख, एक मोटार सायकल, हे सगळं दिल्यानंतर सुध्दा पती सासरच्या लोकांकडे हुंडा मागत आहे.

बुधवारी कोर्टाची तारिख असल्यामुळे दोघही पोहोचले होते. त्यावेळी दोघांच्यात तिथं वाद झाला. चिडलेल्या पत्नीनं चप्पलने पतीला मारहाण केल्याची माहिती मिळाली आहे. कोर्टात कामासाठी आलेल्या लोकांनी त्या दोघांचं भांडणं सोडवलं आहे. दोन्ही वकिलांनी दोघांना पुन्हा समजून सांगितलं आहे.व्हिडीओ सोशस मीडियावर व्हायरल झाल्यापासून याची अधिक चर्चा सुरु आहे.

काही दिवसांपूर्वी यांचं प्रकरण कोर्टात आलं असं वकीलांनी सांगितलं आहे. त्या मुलीने हुंडा मागितल्याचा आरोप केला आहे. ज्यावेळी दोन्ही व्यक्ती जिल्हा कोर्टाच्यासमोर आल्या, त्यावेळी वाद झाला आहे. चिडलेल्या पत्नीने नवऱ्याला जोरदार मारहाण केली आहे.