दिल्ली : नोएडा (delhi) येथील सेक्टर १२२ मध्ये पत्नी आणि पत्नीने आत्महत्या (suicide) केली आहे. नातेवाईक तरुणाला फोन करीत होते. ज्यावेळी तरुणाने फोन उचलला नाही. त्यावेळी नातेवाईकांनी या सगळ्या प्रकरणाची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी (delhi police) ज्यावेळी घरी जाऊन पाहणी केली, त्यावेळी दोघांचा मृतदेह राहत्या घरी पाहायला मिळाला. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आहेत. त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणाची माहिती नातेवाईकांनी दिली आहे. त्याचबरोबर घटनास्थळी पोलिसांना एक आत्महत्येपूर्वी लिहीलेली चिठ्ठी सापडली आहे. पोलिसांनी चिठ्ठी वाचल्यानंतर त्यांना सुध्दा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दिल्लीतील गजियाबादच्या मुरादनगरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने पोलिसांना माहिती दिली की, एक व्यक्ती त्याचा कॉल घेत नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घराची पाहणी केली. ज्यावेळी पोलिस घरी गेले, त्यावेळी तिथं घराचा दरवाजा बंद असल्याचं दिसलं. पोलिसांनी बंद दरवाजा तोडला. त्यावेळी त्यांना आतमध्ये पती आणि पत्नी मृतावस्थेत आढळल्या. त्यावेळी त्यांनी तिथं चिठ्ठी सु्ध्दा मिळाली आहे. त्यामध्ये त्यांनी लिहीलं आहे की, ते दोघे सुध्दा परेशान होते. त्याचबरोबर ते कोणाला खूश ठेऊ शकलो नाही.
ज्यावेळी पोलिसांना संशय आला, त्यावेळी त्यांनी फॉरेन्सिक टीम तात्काळ बोलावून घेतली. फॉरेन्सिक टीमला तिथं विषाच्या बाटल्या सापडल्या आहेत. पोलिसांनी दोन मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दोघांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्या दोघांनी आत्महत्या केली आहे.
पोलिसांना दोघांचा मृतदेह त्यांच्या घरातून मिळाला आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार दोघांचा घटस्फोट झाला आहे. तो तरुण इंजिनिअर होता. त्याचबरोबर तरुणी नर्स होती. पोलिस दोघांनी आत्महत्या का केली याचा तपास करीत आहे. या प्रकरणाला लवकर खुलासा होईल असं पोलिसांनी जाहीर केलं आहे.