नवरा बायकोच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जुनागडमध्ये नवऱ्यानं आपल्या बायकोचा खून (Husband killed wife) केला. भांडण झाल्याच्या रागातून नवऱ्यानं बायकोला धारदार शस्त्रानं भोसकलं आणि तिचा जीव घेतला. ही घटना जुनागडमध्ये घडली. यामुळे जुळ्या मुलांच्या डोक्यावरील आईचं छत्र हरपलंय. आठ जून रोजी हे हत्याकांड घडलं. यानंतर हत्या (Murder case) करणारा नवरा घराला लॉक लावून पळून गेलाय. पण त्याआधी त्यानं आपल्या बायकोचा मृतदेह (Murder mystery) पाण्याची टाकीत फेकला. त्यानंतर घरात घेऊन कपडे बदलले आणि तो पळून गेला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुनागडच्या जवळ असलेल्या खडीया गावात ही धक्कादायक घटना घडली. रामदे नावाचा इसम आपल्या पत्नी लिली आणि दोघा जुळ्या मुलांसोबत राहत होता. दोघा पतीपत्नींचे सतत खटके उडत होते. आठ जूनला भांडण वाढत गेला. पतीला राग अनावर झाला.
यानंतर पत्नीला जीवे मारण्यापर्यंत पतीची मजल पोहोचली. हत्या केल्यानंतर पती थांबला नाही. यानंतर त्याने पत्नीची डेडबॉर्ड थेट पाण्याच्या टाकीत फेकून दिली होती. कुणाला काही कळू नये म्हणून माथेफिरु नवरा घराला लॉक लाईन घरातून निघून गेला होता.
ही घटना दुसऱ्या दिवशी उघडकीस आली. रामदेचा भाजा जयराम ढोला आपल्या म्हशींना बांधण्यासाठी घरी आला तेव्हा त्याला संशय आला. काका घरी नाहीये, घराला टाळं लागलंय हे पाहून जयरामचा संशय अधिकच बळावला. त्याने लगेच सरपंच आणि पोलिसांनी याबाबत सांगितलं. पोलिसांनी घर गाठून टाळं तोडलं आणि आत पाहिलं तर लिलिचा मृतदेह पाण्याच्या टाकीत पडलेला होता.
पोलिसांनी तातडीनं हा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवला. आता याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. घटनास्थळी पोलिसांनी तीन धारदार शस्त्रही सापडली आहे. लिलीचा हत्यारा असलेल्या पती रामदेचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय.