पत्नीने पतीला तीन बायकांसोबत रंगेहाथ पकडले अन्…

| Updated on: Dec 12, 2022 | 2:45 PM

सोइ पेपे परिसरात भाड्याच्या घरात अनोनल आपल्या पत्नीसह राहत होता. अननोलचे अन्य महिलांशी अनैतिक संबंध होते. त्याच्या पत्नीने त्याला तीन महिलांसोबत बेडवर रंगेहाथ पकडले.

पत्नीने पतीला तीन बायकांसोबत रंगेहाथ पकडले अन्...
पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या
Image Credit source: Google
Follow us on

नवी दिल्ली : पती-पत्नीच्या नात्यात विश्वास महत्वाचा आहे. जर नात्यातील विश्वास तुटला तर नाते टिकणे कठिणच. अशीच एक घटना दक्षिण थायलंडमध्ये उघडकीस आली आहे. पतीला तीन महिलांसोबत बेडवर रंगेहाथ पकडल्यानंतर संतापलेल्या पत्नीने फेसबुक लाईव्ह करण्यास सुरुवात केली. यामुळे चिडलेल्या पतीने आधी पतीला कानशीलात लगावली. त्यानंतर पत्नीवर गोळी झाडत तिची हत्याच केली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.

आरोपी पतीला पोलिसांकडून अटक

अनोनल मैक सुथिकेन असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. मुएंग पोलिसांनी दिलेल्या माहितीमुसार आरोपी अनोनल हा ड्रग्ज सिंडीकेटचा सदस्य आहे. घटनेनंतर अनोनल तिन्ही मैत्रिणींसह फरार झाला आहे.

सोइ पेपे परिसरात भाड्याच्या घरात अनोनल आपल्या पत्नीसह राहत होता. अननोलचे अन्य महिलांशी अनैतिक संबंध होते. त्याच्या पत्नीने त्याला तीन महिलांसोबत बेडवर रंगेहाथ पकडले.

हे सुद्धा वाचा

पतीला मैत्रिणींसोबत बेडवर पाहून पत्नी संतापली अन्…

पतीला परक्या महिलांसोबत बेडवर पाहून अननोलची पत्नी संतापली. यानंतर ती पतीचे थेट फेसबुक लाईव्ह करु लागली. यामुळे अननोलच्याही संतपाचा पारा चढला. त्याने पत्नीला मारहाण केली. मग त्याने आधी हवेत गोळी झाडली आणि त्यानंतर थेट पत्नीवर गोळी झाडली.

पत्नीची हत्या केल्यानंतर पती पळून गेला

पत्नीची हत्या केल्यानंतर पत्नीला मृतावस्थेत रस्त्यावर सोडून तीन मैत्रिणींसह तो टोयोटा सेडान कारमधून पळून गेला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला.

यानंतर पोलिसांनी आरोपी पतीलाही अटक केली आहे. पोलिसांनी महिलेचा फेसबुक लाईव्हचा व्हिडिओही ताब्यात घेतला आहे.