लखनऊ | 4 ऑगस्ट 2023 : सजणं, छान तयार होणं हे प्रत्येकालाच आवडतं. पुरूष असो वा महिला, प्रेझेंटेबल दिसायला कोणाला आवडत नाही ? महिलांना तर त्याची जरा जास्तच आवड असते. विवाहीत किंवा लग्न न झालेल्या, सर्वच महिलांना शृंगार करायला खूप आवडतं. पण हीच आवड एक विवाहीत महिलेच्या (married woman dead) जीवावर बेतली. लग्नानंतर सजून-धजून तयार होण्याची सवय तिच्या जीवाशी येईल, असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण हाच शृगांर तिच्या मृत्यूसाठी (death) कारणीभूत ठरला.
ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील फर्रूखाबादच्या मऊदरवाजा येथील आहे. तेथे तीन दिवसांपूर्वी झालेल्या एका हत्येने खळबळ माजली आहे. येथे एका विवाहीत महिलेची गोळ्या मारून हत्या करण्यात आली आणि ती हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून तिचाच जन्माचा जोडीदार, पती निघाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या हत्येमागचे कारण ऐकून तर पोलिसही सुन्न झाले आहेत.
का केली पत्नीची हत्या ?
पोलिसांनी आरोपीची चौकशी केली असता त्याने पत्नीला मारण्याचे कारण सांगितले. त्याची पत्नी दिसायला अतिशय सुंदर होती आणि ती रोज सजून-धजून तयार व्हायची, केवळ याच कारणामुळे त्याने बायकोला संपवलं. पत्नी घरात रोज चांगले कपडे घालायची, नीट आवरून मेकअप करून तयार व्हायची, याच कारणामुळे आरोपीला तिच्यावर संशय होता. तिचं कोणाशी प्रेम-प्रकरण तर सुरू नाही ना, त्यामुळेच ती रोज एवढी सजते, असा संशय पतीला आला होता.
घटनेच्या दिवशी आरोपीची पत्नी वॉशरूम वापरण्यासाठी बाहेर गेली असता, आरोपीही हळ-हळू तिच्या मागे गेला. त्याने तिचा पाठलाग केला आणि ती शेतात पोहोचल्यानंतर त्याने सरळ तिच्यावर गोळ्या झाडून तिची हत्या केली. त्याने प्रथम तिच्यावर एक गोळी झाडली, त्यानंतर दुसरी गोळी झाडली, ती मृत्यूमुखी पडल्यानंतर आरोपी तेथून फरार झाला. पोलिसांनी त्याचा कसून शोध घेत त्याला अटक केली व हत्या करण्यासाठी वापरलेले शस्त्रही ताब्यात घेतले.