Crime : उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या कन्नौज जिल्ह्यात पतीनं त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकरासह 5 महिन्यांच्या चिमुरडीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. तसंच पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.
कनौज जिल्ह्यातील इंदरगढ येथील पोलीस स्टेशन हद्दीतील तुंडपुरवा गावात 35 वर्षीय मनोज कुमार जाटव मैनपुरी हा रिक्षाचालक राहत होता. तो त्याची पत्नी आणि मुलांसह भाड्याच्या घरात राहत होता. यावेळी त्याच्या पत्नीचं राधा उर्फ पिंकी मैनपुरीचं सत्येंद्र नावाच्या व्यक्तीशी प्रेमप्रकरण होतं. त्यामुळे काही दिवसांनंतर पिंकी पती मनोजला सोडून प्रियकर सत्येंद्रसोबत राहू लागली. यामुळे मनोज नाराज झाला आणिकन्नौज येथील आपल्या घरी जात तिथेच राहू लागला.
दोन वर्षांनंतर मनोज पत्नी पिंकी आणि तिचा प्रियकर सत्येंद्र कन्नौज येथील त्याच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत एक पाच महिन्यांची मुलगी देखील होती. त्या तिघांना पाहून मनोज संतापला आणि त्याने लाकडी काठीने त्यांच्यावर हल्ला केला. मनोजने पिंकी आणि सत्येंद्र यांच्यासोबत पाच महिन्यांच्या मुलीलाही बेदम मारहाण केली.
दोन वर्षांनंतर अचानक बुधवारी रात्री पिंकी आणि सत्येंद्र त्यांच्या पाच महिन्यांच्या चिमुरडीसह मनोजच्या घरी पोहोचले. त्यांना पाहून मनोजला राग अनावर झाला आणि त्याने त्या तिघांना बेदम मारहाण केली. यावेळी अमानुष हल्ला करत मनोजनं सत्येंद्र आणि पिंकीची हत्या केली. तर प्रियकराची मुलगी समजून 5 महिन्यांच्या चिमुरडीचीही त्यानं हत्या केली.