भोपाळ : मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यात एका महिलेच्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. तिच्या मृत्यूनंतर तिचा मृतदेह घरातील फ्रीजरमध्ये (dead body of woman in freezer) ठेवण्यात आला होता आणि तिचा पती खुर्चीत निवांत बसला होता, त्याच्या चेहऱ्यावर असे भाव होते, जणू काही झालंच नाहीये. एवढंच नव्हे तर त्याने आपल्या पत्नीच्या मृत्यूची माहिती नातेवाईकांनाही दिली नाही. तिचा मृत्यू नेमका कसा झाला याचा पोलिस शोध घेत आहेत.
त्या महिलेच्या कुटुंबियांना इतर कोणाकडून ही माहिती समजल्यावर ते तिच्या घरी गेले असता अवाक् झाले. मृत्यूचे वृत्त कळताच ते तडक तिचा घरी पोहोचले असता तिचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांना या घटनेची माहिती कळताच ते घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास सुरू असून सध्या या घटनेनेन सर्वत्र खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जिउला गावातील आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित्री यांचा मृत्यू झाल्याची तक्रार अज्ञात व्यक्तीने पोलिस ठाण्यात कोणीतरी केली होती. सुमित्री यांचा मृतदेह एका मोठ्या फ्रीजरमध्ये ठेवण्यात आला असून त्यांचा पती भरत, हा शेजारी खुर्ची टाकून बसला आहे. घटनास्थळ गाठून पोलिसांनी तपासाला सुरूवात केलू असून मृत महिलेच्या पतीचा जबाबही नोंदवला आहे. सुमित्री यांना काविळ झाल्याने 1 जुलै रोजी रात्री त्यांचा मृत्यू झाला. मुलाची वाट पहात होतो म्हणूनच सुमित्री यांचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवला होता, असे भरत यांनी त्यांच्या जबाबात नमूद केले. पोलिसांनी त्यांचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
भावाचे मेव्हण्यावर गंभीर आरोप
तर दुसरीकडे सुमित्रीच्या मृत्यूनंतर तिच्या नातेवाईकांनी जावई भरत याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सुमित्रीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली, पण ही घटना नेमकी कधी घडली हे कळलेच नाही, असे तिचा भाऊ अभय यांनी सांगितले. एक जुलैला बहिणीच्या मृत्यूची बातमी कळताच आम्ही तडक तिकडे गेलो असता, तिचा मृतदेह फ्रीजरमध्ये ठेवल्याचे आढळले. सुमित्री हिचा पती तिला कोंडून ठेवत अस. त्याचे इतर महिलांशीही संबंध होते, याच कारणामुळे त्याने आमच्या बहिणीची हत्या केली, असा आरोप तिच्या नातेवाईकांनी लावला आहे.
वांत बसला होता.