गाझियाबाद : पती-पत्नीमध्ये काही कारणातून काल रात्री वाद झाला. या वादातून पत्नीला संपवण्याच्या हेतूने पतीने घरातील गॅस सिलेंडरचे रेग्युलेटर सुरु केले. यामुळे संपूर्ण घरात गॅस पसरला. पत्नीच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर तिने जोरदार आरडाओरजा केला. पत्नीचा आरडाओरडा ऐकून नातेवाईक आणि शेजारी धावत आले आणि रेग्युरेटर बंद केले. मात्र पतीने लाईटर पेटवल्याने घरभर पसरलेल्या गॅसमुळे आग लागली. संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी गेले. यात पत्नीसह मदतीसाठी आलेले नातेवाईक आणि शेजारी असे 10 लोक होरपळले. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लोणी क्षेत्रातील टिळक नगर कॉलनीत ही घटना घडली. सुरेश असे आग लावणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, सुरेशने पत्नीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. रागाच्या एलपीजी गॅस पाईप ओढला, ज्यामुळे खोलीत गॅस भरला. गॅस पसरल्यावर रितूने मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य तेथे पोहोचले आणि त्यांनी गॅसचे रेग्युलेटर बंद केले. दरम्यान, सुरेशने गॅस लायटर लावल्याने खोलीला आग लागली आणि घरातील साहित्य जळून खाक झाले.
सर्व जखमींना ईशान्य दिल्लीतील जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नातेवाईकांचा आरोप आहे की, आरोपीचे दुसऱ्या महिलेशी अवैध संबंध असल्याने त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे. कुटुंबीयांची लेखी तक्रार आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.