पनवेल | 12 फेब्रुवारी 2024 : राग.. माणसाचा महाभयानक शत्रू… डोक्यात राग घुसलेला माणूस कधी काय करून बसेल याची शाश्वती नाही. त्या रागाच्या भरात तो असं एखादं कृत्य करतो की त्यामुळे क्षणात सगळं विस्कटू शकतं. समोरच्याला तर त्रास होतोच पण रागात ती कृती करणाऱ्याचं आयुष्यही बरबाद होऊ शकतं. अशाच रागामुळे भयानक परिस्थिती उद्भवून संसाराची राखरांगोळी झाल्याची धक्कादायक घटना पनवेल येथे घडली. एका क्षुल्लक गोष्टीमुळे पती-पत्नीमध्ये वाद झाला, बघता -बघता तो वाद टोकाला गेला की पती संतापला आणि त्याच रागाच्या भरात त्याने स्वत:च्याच पत्नीवर ॲसिड हल्ला केला.
नवऱ्याच्या बहिणीकडे जायला नकार दिला म्हणून फेकलं ॲसिड
हो , हे खरं आहे. पनवेलमधील खैरणे गावात ही दुर्दैवी घटना घडली. यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रमजान सिद्दीकी असे आरोपीचे नाव असून अमीना असे पीडित पत्नीचे नाव आहे. 20 जानेवारी रोजी रमजाने याने पत्नीवर ॲसिड फेकले. रमजान याला त्याच्या बहिणीच्या घरी हैदराबादल जायचं होतं, आपल्यासोबत चल असं तो पत्नीलाही सांगतं होता. मात्र त्याची पत्नी काही सोबत येण्यास तयार नव्हती.
याच मुद्यावरून त्यांचं भांडण झालं आणि हळूहळू ते इतक वाढलं की वाद विकोपाला गेला. त्या भांडणामुळे संतापलेल्या पतीने रागाच्या भरात पत्नीच्या चेहऱ्यावरती ॲसिड टाकलं. यामुळे ती गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर पत्नी अमिना तातडीने पश्चिम बंगाल येथे निघून गेली. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. तेथे जाऊन तिने पतीविरोधात बनियापुकुर येथे तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी गुन्हा दाख केला. त्यानंतर पनवेल तालुका पोलीस स्टेशन मध्ये देखील तक्रार प्राप्त झाली. पुढील तपास पनवेल तालुका पोलीस करत आहेत.