नवरा बायकोमधील (Husband wife dispute) अजब भांडणं आणि विचित्र किस्से वारंवार समोर येतात. अशातच आाता समोर आलेल्या एका प्रकाराने आश्चर्य व्यक्त केलं जातंय. एका पत्नीनं आपल्या पतीविरोधात कोर्टात धाव घेतली. ही धाव घेण्यामागचं कारणही फारचं विक्षिप्त आहे. मध्य प्रदेशच्या इंदूरमधील (Madhya Pradesh Crime News) ही घटना असून पीडित पत्नीनं आपल्या पतीविरोधात याचिका दाखल केली. पत्नीनं केलेल्या आरोपांनुसार, तिचा पती हा संध्याकाळनंतर स्त्रियांसारखा सजतो आणि शृंगार करतो. शिवाय आपल्यासोबत प्रेम संबंध (Physical Relation of Husband and Wife) ठेवत नाही, अशीही तक्रार पत्नीनं केलीय. रात्री तो दुसऱ्या खोलीत जाऊन झोपतो, असंही पत्नीनं म्हटलंय. पीडित पत्नीचा पती हा पेशानं इंजिनिअर असून ही घटना समोर आल्यानं सगळेच चकीत झालेत.
पती विचित्र वागत असल्यानं या महिलेने कोर्टात धाव घेतली. रात्री झोपण्याआधी महिलांसारखे शृंगार करणाऱ्या या पतीविरोधात पत्नीनं तक्रार केलीय. जिल्हा न्यायालयात याप्रकरणी सुनावणीही झाली. त्यानंतर कोर्टानं पतीला फटकारलंय. पीडित पत्नीला भत्ता देण्याचे आदेश जिल्हा कोर्टानं या इंजिनिअर पतीला दिले आहेत.
इंदूरमध्ये घडलेल्या या घटनेनंतर आता हे पती-पत्नी चर्चेत आले आहेत. 29 एप्रिल 2018 ला त्यांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर काहीह दिवस चांगले गेले. पण त्यानंतर सासरचे छोट्या-मोठ्या कारणावरुन पत्नीला टोमणे मारायचे.
नेहमीच्या खर्चाचे पैसेदेखील या पीडितेकडे मागितले जात असल्याचाही आरोप करण्यात आलाय. पैसे दिले नाहीत, तर तिला एका खोलीत बंद करुन ठेवलं जात होतं. इंजिनिअर पती एकदा पत्नीला पुण्याला घेऊन आला होता आणि तिथे त्यानं पीडितेचा छळ केला, असा युक्तिवाद पीडितेच्या वकिलांनी केलाय. पीडितेचा पती तिच्याशी संबंध ठेवत नव्हता आणि सगळा खर्च तिच्याकडून घेत होता, असा आरोप करण्यात आलाय.
टिकली, लिपस्टिक आणि कानातले घालून पीडित पत्नीचा पती शृंगार करायचा आणि पीडितेचा मानसिक छळ करत होता, असाही आरोप केला गेलाय.12 जून 2022 रोजी पीडितेला माहेरी आणून सोडण्यात आलं होतं. पीडितेनं आपल्याकडे पतीनं केलेल्या विक्षिप्त गोष्टींचे फोटो आणि व्हिडीओही असल्याचा दावा केलाय. यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली होती.
हे सगळं प्रकरण कोर्टात गेल्यानंतर पीडित पत्नीच्या विक्षिप्त पतीला अटक करण्यात आली आणि त्याला कोठडी सुनावण्यात आली होती. आता या संपूर्ण प्रकरणी पीडितेला दिलासा देत कोर्टानं पतीला झापलंय. तसंच पीडितेला दरमहा 30 हजार रुपये पोटगी द्यावी लागणार आहे. मार्च 2021 पासूनचे थकलेले पैसे विक्षिप्त पतीला द्यावे लागतील, असं म्हणत पीडितेच्या बाजूने निकाल दिलाय.