हैदराबाद : अपघातात बाईकस्वाराला प्राण गमवावे लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील हैदराबाद शहरात (Hyderabad Accident) दुंडीगल भागात ट्रक आणि बाईकचा अपघात (Bike Accident) झाला. डाव्या बाजूने कट मारुन पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना ट्रकने बाईकला धडक दिली. त्यानंतर ट्रकखाली चिरडून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. आज (सोमवार नऊ मे) रोजी सकाळी सव्वाआठ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात (CCTV Camera) कैद झाला आहे. सायबराबाद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
CCTV | कट मारुन जाण्याचा प्रयत्न जीवावर, ट्रकखाली चिरडून बाईक स्वाराचा मृत्यू #ACCIDENT #cctv #Dundigal #Hyderabad pic.twitter.com/R7QAZcgmzB
हे सुद्धा वाचा— TV9 Marathi (@TV9Marathi) May 9, 2022
आंध्र प्रदेशातील हैदराबाद शहरात दुंडीगल भागात ट्रक आणि बाईकचा अपघातात होऊन बाईकस्वाराला जीव गमवावा लागला आहे. ट्रकच्या डाव्या बाजूने कट मारुन पुढे जाण्याचा प्रयत्न बाईकस्वार करत होता. यावेळी ट्रकचा बाईकला धक्का लागला आणि त्यानंतर दुचाकीस्वार तरुण ट्रकखाली चिरडून ठार झाला.
सोमवारी सकाळी भर रस्त्यात रहदारीच्या वेळी सव्वा आठ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघाताचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून दुचाकीस्वार ट्रकखाली चिरडला गेल्याची अंगावर काटा आणणारी दृश्यं कॅमेरात कैद झाली आहेत. सायबराबाद पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, ट्रक चालकासाठी डावी बाजू हा ब्लाईंड स्पॉट असून बाईक स्वाराने त्या बाजूने कट मारुन ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न टाळायला हवा होता, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटत आहेत.
दरम्यान, तेलंगणातील कामारेड्डी जिल्ह्यात ट्रक आणि ट्रॉलीची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या अपघातात 8 जण ठार झाले असून 17 जण जखमी झाले आहेत. एल्लारेड्डी मंडलच्या हसनपल्ली गेटजवळ सुमारे 26 प्रवासी घेऊन जाणाऱ्या ऑटो ट्रॉलीला वेगवान ट्रकने जोरदार धडक दिली होती.