हैदराबाद – मुस्लीम तरुणीशी (Muslim Girl) हिंदु तरुणाने विवाह (Hindu Muslim Marriage) केल्यानंतर तरुणाचा भर रस्त्यात हत्या केल्याची धक्कादायक घटना हैदराबादेत(Hydrabad Crime) घडली आहे. सरुरुनगरमध्ये नागराजू नावाच्या तरुणाची त्याच्या मेव्हणाने भर रस्त्यात मारहाण करुन हत्या केली आहे. नागराजूवर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला, त्याला मारहाण करण्यात आली, त्यानंतर चाकूने भोकसून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकरणात पोलिासंनी दोघांना अटक केली आहे. भररस्त्यात रहदारी असलेल्या ठिकाणी हा प्रकार घडला. नागराजू त्याची पत्नी सुल्तानाला सोबत घेऊन बाईकवरुन सरुरनगरकडे चालला होता. त्यावेळी तहसीलदार कार्यालयाजवळ दोघांनी लोखंडी रॉड आणि चाकुने नागराजूवर हल्ला केला. नागराजूच्या पत्नीसमोरच त्याची हत्या करण्यात आली. नागराजूच्या परिवाराने सुल्तानाच्या कुटुंबीयांविरोधात हत्येचा आरोप केला आहे. तर हिंदू संघटनांनीही या प्रकरणात उडी घेतली असून, पोलीस आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली आहे.
Hyderabad मध्ये मुस्लिम मुलीशी लग्न केलं म्हणून भर रस्त्यात तरुणाचा खून… pic.twitter.com/P3SOUPoLtR
हे सुद्धा वाचा— Abhishek karande (@Abhishekkaran16) May 5, 2022
नागपाजू हा रंगारेड्डी जिल्ह्यातील मपरपल्ली गावातील रहिवासी होता. तर सुल्ताना त्याच्या शेजारी असलेल्या घानापूर गावात राहत होती. दोघेही सात वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते. मात्र या लग्नाला सुल्तानाच्या घरातून विरोध होता. 31 जानेवारीला पळून जाऊन नागराजू आणि सुल्ताना यांनी लाल दरवाजा परिसरात आर्य समाज मंदिरात लग्न केले होते. त्यानंतर त्याने सुल्तानाचे नाव बदलून पल्लवी असे ठेवले होते.
तरुणाच्या हत्येनंतरचा व्हिडिओ… pic.twitter.com/FcD5D55C9m
— Abhishek karande (@Abhishekkaran16) May 5, 2022
नागराजू एका कार शोरुममध्ये सेल्स मन म्हणून काम करीत होता. ४ महिन्यांपूर्वी त्याने सुल्तानाशी लग्न केले होते. हल्ल्याच्या वेळी सुल्ताना घटनास्थळी उपस्थित होती. तिने आरोप केला आहे की, तिचा भाऊ आणि त्याच्या काही मित्रांनी हा हल्ला केला. सुल्तानाचा भाऊ आणि भावोजीला या प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृत बिलासपुरम नागराजू आणि त्याची पत्नी सुल्ताना हे एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते, आणि त्यांनी या वर्षी जानेवारीत लग्न केले होते. सुल्तानाचे नाव पल्लवी करण्यात आले होते. या लग्नामुळे सुल्तानाचा भाऊ नाराज होता, त्यातूनच ही हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांना आहे. या प्रकरणात अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
तेलगंणाचे भाजपा आमदार राजा सिंह यांनी या प्रकरणात हत्या करणाऱ्या आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे. हत्या करणारे परिवारातील सदस्यच होते का, कोणत्या धार्मिक गटाने आरोपींना असे करण्याचा सल्ला दिला होता का, त्यांना कुणी आर्थिक मदतीचे आमिष दाखवले होते का, अशा सर्व एंग्ल्सनी या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे.