इचलकरंजी : दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून मित्रानेच मात्राच्या गळ्यावर कटरने (Friend Attack On Friend) वार केल्याची घटना कोल्हापुरात घडली. याप्रकरणी संशयित मित्रालाॉ पोलिसांनी अटक केली आहे. तर ज्याच्यावर वार झाला तो मित्र गंभीर जखमी झाला आहे (Friend Attack On Friend).
कोल्हापुरातील इचलकरंजी येथे दारु पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने रागाच्या भरात एका मित्राने दुसऱ्या मित्रावर कटरने वार केला. त्याने मित्राच्या गळ्यावर कटरने वार केलेत यामध्ये मित्र मनोज राम आशिष सिंग (वय 46) गंभीर जखमी झाला. तर या प्रकरणी मित्र किरण गणपती काकडे याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज सिंग आणि किरण काकडे हे दोघेजण मित्र असून ते एकाच प्रोसेसमध्ये कामाला आहेत. काकडेला दारुचे व्यसन आहे. शनिवारच्या रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास काकडे हा मनोज याच्याकडे गेला. त्याने मनोजकडे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यावर मनोज याने पैसे देण्यास नकार दिला.
मनोजने पैसे देण्यास नकार देताच काकडेला राग अनावर झाला. त्याने मनोजला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर हातातील कटरने मनोजच्या गळ्यावर वार केला. त्यामध्ये मनोज हा जखमी झाला. त्यानंतर त्याला तात्काळ उपचारासाठी सांगली येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले (Friend Attack On Friend).
याप्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली. शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मनोजच्या तक्रारीवरुन काकडे याच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी काकडेला बेड्या ठोकल्या. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पत्नीला मेसेज करत असल्याचा संशय, तरुणाला बेदम मारहाण, व्हिडीओही व्हायरल, पती फरारhttps://t.co/2cLQkCdIFz#vikhrolicrime #CrimeNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 8, 2021
Friend Attack On Friend
संबंधित बातम्या :
प्रियकराने पेट्रोल ओतून पेटवलं, प्रेयसीने मिठी मारली, मुंबईत तरुणाचा होरपळून मृत्यू
नागपूर पुन्हा हत्येच्या घटनेने हादरलं, गुंडाच्या सततच्या त्रासाला कंटाळून दगडाने ठेचून हत्या