कोल्हापूर : चिथावणीखोर व्हॉट्सअॅप स्टेटस (WhatsApp Status), इन्स्टा स्टोरी (Insta Story) ठेवणाऱ्यांच्या मुसक्या इचलकरंजी पोलिसांनी आवळण्यास सुरुवात केली आहे. इचलकरंजीत दहशत (Ichalkaranji) माजवण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर शस्त्र आणि आव्हानात्मक मजकूर ठेवणार्या तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. गौरव शरद मरडे (वय 25 रा. लक्ष्मीमाळ रुई), अक्षय प्रकाश पाटील (वय 26 रा. कोल्हापूर नाका) आणि ओंकार सचिन लोले (वय 20 रा. खोतवाडी) अशी त्यांची नावं आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Ichalkaranji police takes action against criminals who keep whatsapp status with weapons)
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या काहीजणांकडून इन्स्ट्राग्राम, व्हॉट्सअॅप अशा सोशल मीडीयावर घातक शस्त्रे तसेच चिथावणीखोर आव्हानात्मक मजकुराचा स्टेटस ठेवण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या प्रकाराची अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपाधिक्षक बाबुराव महामुनी यांनी गांभीर्याने दखल घेतली. त्यांनी रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश वासुदेव याच्यासह त्याच्या टोळीला अटक केली.
वाचा : मर्डरला एक वर्ष पूर्ण, दुसऱ्या वादळाची तयारी सुरु, पॅरोलवरील आरोपीच्या स्टेटसने खळबळ
ही घटना ताजी असतानाच गौरव मरडे, अक्षय पाटील आणि ओंकार लोले यांनी हातात बंदुक घेऊन इन्ट्राग्रामवर स्टोरी आणि व्हॉटसपवर स्टेटस ठेवल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळं मरडे, पाटील आणि लोले या तिघांना शुक्रवारी अटक केली.
इचलकरंजीत स्टेशन रोडवरील इदगाह मैदान परिसरात 10 डिसेंबर 2019 रोजी पूर्ववैमनस्यातून दीपक महादेव कोळेकर (वय 26 रा. राधा कन्हैय्या प्रोसेसमागे लक्ष्मी वसाहत कोरोची) याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आकाश वासुदेव, अक्षय नरळे, मेहबूब उकले, आदिनाथ बावणे, सुनिल वाघवे, कासिम नदाफ आणि सागर आमले या सात जणांना अटक करण्यात आली होती. सध्या हे सर्वजण जामिनावर बाहेर आहेत.
हत्येच्या घटनेला वर्ष झाल्याच्या निमित्ताने आकाश वासुदेव याने व्हॉट्सअॅपवर ‘मर्डरला वर्ष पूर्ण, दुसर्या वादळाची तयारी सुरु’ अशा आशयाचा व्हिडीओ स्टेटस् म्हणून ठेवला होता. या संदर्भातील माहिती पोलिस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांना समजल्यानंतर त्यांच्या आणि शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडील गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद मगर यांच्या पथकाने वासुदेवला सोमवारी रात्री ताब्यात घेतलं. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याची 15 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
(Ichalkaranji police takes action against criminals who keep whatsapp status with weapons)
संबंधित बातम्या
आधी ‘वादळाचा’ इशारा, आता बंदुकांसह इन्स्टा स्टोरी, इचलकरंजीत गुन्हेगारांची हिंमत वाढली