काबूल : जगभरातील अनेक देशामध्ये अनेक प्रथा, परंपरा सुरु आहेत. यातील काही प्रथा जशा चांगल्या असतात त्याचप्रमाणे काही कुप्रथाही आहेत. त्या त्या कुप्रथा बंद पाडण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक सामाजिक संघटना प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांना अजूनही हवे त्या प्रमाणात यश मिळाले नाही. अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेली ही कुप्रथा मोडण्यासाठीही अनेक प्रयत्न झाले. पण, अद्यापही ही कुप्रथा सुरू आहे. पाकिस्तानमध्येही लहान मुलांची सट्टेबाजी केली जाते. परंतु, अफगाणिस्तानमध्ये या लहान मुलांबाबत जे काही केले जाते त्याला कुकर्मच म्हणावे लागेल.
अफगाणिस्तानमधील या कुप्रथेला जगभरातून विरोध केला जात आहे. अफगाणिस्तानात जुनाट आणि प्रतिगामी विचारसरणीचे लोक आहेत. तेथील नियमांमुळे सार्वजनिक ठिकाणी स्त्रिया भेट देऊ शकत नाही. त्यांना पार्टी आणि नृत्य करण्यास मनाई आहे. स्त्रियांशी संवाद साधणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य असल्यामुळे प्रौढ पुरुष आपल्या मनोरंजनासाठी वेगळा पर्याय शोधतात.
उच्च आणि श्रीमंत अफगाणी अनेकदा मैफिल आयोजित करतात. पारंपारिक अफगाणी संगीताच्या तालावर हे अक्षरशः बेधुंद होतात. मात्र, येथील स्त्रियांना पार्टी आणि नृत्य करण्यास बंदी असल्यामुळे त्यांच्या जागी लहान मुलांना वापरले जाते. ‘डान्स’ शिकलेली ही अल्पवयीन मुले गरीब वर्गातील असतात.
तथाकथित उच्चवर्गीय लोकांचे नृत्य करून ही मुले मनोरंजन करतात. पण, त्यांना या कामाच्या बदल्यात फक्त कपडे आणि अन्नच मिळते. गरीब परिस्थिती आणि जीवन जगण्याची हतबलता यामुळे ही मुले अशी कामे करण्यास तयार होतात. या मैफिलीला ‘बच्चा बाजी’ असे विशेष नाव आहे.
10 वर्षे वयाच्या मुलांना श्रीमंत लोक मुलींचे कपडे घालायला लावतात. मुलांना मुलींचे कपडे घालून, खोटे स्तन लावून, मेक अप करून आणि पायात घुंगरू बांधून अश्लील गाण्यांवर त्यांना नाचवले जाते. ज्या पुरुषांना स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त इंटरेस्ट असतो अशा पुरुषांची या मैफलीला जास्त हजेरी असते.
मैफिल संपल्यावर ‘ऐ लड़के, तुमने मेरे बदन में आग लगा दी है’ असे म्हणत हे पुरुष त्यांच्या आवडत्या नृत्य करणाऱ्या मुलाबरोबर रात्र घालवतात. त्यांच्यावर अत्याचार करतात. एकदा का मुलगा या गर्तेत अडकला की तो यात आणखी फसला जातो. अशा मुलांना इथे ‘लौंडे’ किंवा ‘बच्चा बेरीश’ म्हणतात.
बच्चा बाजीसाठी मुलांचे अपहरण करून त्यांना विकण्यात येते. ज्यांना दाढी, मिशी आलेली नाही अशी मुले बच्चा बाजीसाठी उपयुक्त मानतात. ही प्रथा आजही अफगाणिस्तानात सुरू आहे. कारण, यात अनेक प्रभावशाली आणि श्रीमंत लोक सहभाग घेतात. येथे ‘बच्चा बेरीश’ किंवा ‘दाढी नसलेला मुलगा’ बाळगणे हे उच्च सामाजिक प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाते.
अय्याश अफगाणी श्रीमंत लोक या मुलांचा ‘लैंगिक गुलाम’ म्हणून वापर करतात. पण, या मुलांचे वय एकोणीस झाल्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडले जाते. ही कुप्रथा मोडण्यासाठी आज सर्वचजण आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. मात्र, ही कुप्रथा ते मोडू शकले नाहीत.