प्रेमसंबंधातील वाद टोकाला गेला, प्रियकराने प्रेयसीचा गळाच चिरला

| Updated on: Dec 14, 2022 | 8:03 PM

वैशाली मस्तूद आणि संदीप अहिरे हे शेजारी शेजारी राहत होते आणि त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध सुरु होते. प्रेमसंबंधातून या दोघांमध्ये वाद झाले होते.

प्रेमसंबंधातील वाद टोकाला गेला, प्रियकराने प्रेयसीचा गळाच चिरला
प्रेमसंबंधातील वादातून प्रियकराकडून प्रेयसीची हत्या
Image Credit source: Tv9
Follow us on

डोंबिवली : प्रेमप्रकरणात झालेल्या वादातून प्रेयसीची हत्या केल्याची घटना डोंबिवलीत उघडकीस आली आहे. प्रेयसीची हत्या केल्यानंतर आरोपी तरुण थेट मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल झाला आणि तिथे त्याने हत्येची कबुली दिली. संदीप अहिरे असे या प्रियकराचे नाव आहे. तर वैशाली मस्तूद असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. मानपाडा पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

पोलीस ठाण्यात येत हत्या केल्याची सांगितले

डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्यात जवळपास दोन वाजण्याच्या सुमारास एक तरुण आला. या तरुणाने मी शेजारी राहणाऱ्या महिलेची हत्या करुन पोलीस ठाण्यात आलो आहे असे सांगितले. हे ऐकताच पोलीस हैराण झाले.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहिले महिलेचा मृतदेह आढळला

तात्काळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. कल्याण शीळ रोड परिसरातील टाटा नाका परिसरातील श्रीहरी चाळीत पोलीस दाखल झाले. पोलिसांनी महिलेच्या घरी जाऊन पाहिले असता खरोखर तिचा मृतदेह घरात आढळून आला.

हे सुद्धा वाचा

मयता आणि आरोपी शेजारी राहत होते

वैशाली मस्तूद आणि संदीप अहिरे हे शेजारी शेजारी राहत होते आणि त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध सुरु होते. प्रेमसंबंधातून या दोघांमध्ये वाद झाले होते. या वादातून संतापलेल्या संदीपने आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास तिचे घर गाठले. तिच्या घरात कुणी नव्हते.

वादातून संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीचा गळा चिरला

या दोघांमध्ये वाद झाला संतापलेल्या संदीपने ब्लेडने वैशालीचा गळा चिरला. या घटनेत वैशालीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वैशालीला तिथे सोडून संदीपने थेट मानपाडा पोलीस ठाणे गाठले.

संदिपने पोलिसांकडे आपण केलेल्या या कृत्याची कबुली दिली. पोलिसांनी संदीप अहिरेला ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.