डोंबिवली : ऐन दिवळीस डोंबिवली परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती वादातून (Family Dispute) रागाच्या भरात मामाने भाच्याची धारदार चाकूने राहत्या घरात कुटुंबीयांसमोरच हत्या (Murder) केल्याची घटना घडली आहे. सतीश दुबे असे हत्या करणाऱ्या आरोपी मामाचे नाव आहे. दिवाळीच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या पोलिसांनी या आरोपीला बेड्या ठोकत (Accused Arrested) पुढील तपास सुरू केला आहे.
दिवाळीनिमित्त संपूर्ण देशभरात उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. या आनंदावर विरजण टाकणारी बातमी डोंबिवलीत घडली आहे. डोंबिवली पूर्वेतील देसलेपाडा विनायक कुंडल सोसायटीत घरगुती वादातून मामाने सख्या भाच्याची हत्या केल्याचा खळबळजनक प्रकार घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी सतीश हा बहिण सरिता तिवारी यांच्या घरीच राहत होता. सरिता यांच्या घरात तिचा पती, मुलगा आणि सरिताचे वडील आणि आरोपी सतीश असे चार जण एकत्र राहत होते.
घरगुती कारणातून सतीशने वडील आणि सरिताचा पती संजय यांच्याशी भांडण सुरू केले. शिवीगाळ करुन तो दोघांना मारहाण करण्यास धावत होता. भांडण सोडविण्यासाठी भाच्याने हस्तक्षेप केला.
वडिलांना का शिव्या देतो? अशी विचारणा मामला केली. याचा राग सतिशला आल्याने त्याने रागाच्या भरात स्वयंपाक घरातील धारदार चाकूने सर्वांसमोर यशवर सपासप वार केले आणि तेथून पळ काढला.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या भाच्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी भाच्याची हत्या करून फरार झालेल्या मामाला डोंबिवलीतील एका खाजगी कंपनीतून बेड्या ठोकल्या. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.