आपसातील भांडण टोकाला गेले, मग दोन जवान एकमेकांना भिडले, पुढे जे घडलं…

| Updated on: Jul 04, 2023 | 5:01 PM

एसआरपीएफच्या दोन जवानांमध्ये काही कारणातून वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि पोलीस कॅम्पमध्ये भयंकर घडले.

आपसातील भांडण टोकाला गेले, मग दोन जवान एकमेकांना भिडले, पुढे जे घडलं...
गोव्यातून बाईक चोरुन कोल्हापुरात विकणाऱ्या दुकलीला अटक
Follow us on

गडचिरोली : आपसातील वादातून राज्य राखीव दलाच्या एका जवानाने सहकाऱ्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना गडचिरोलीत घडली आहे. जिल्ह्यातील देसाईगंज वडसा तालुका मुख्यालयाच्या कॅम्पमध्ये ही घटना घडली. सुरेश मोतीलाल राठोड असे मयत जवानाचे नाव आहे. तर मारुती सातपुते असे आरोपी जवानाचे नाव आहे. याप्रकरणी देसाईगंज पोलीस ठाण्यात हत्येची नोंद करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांना आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?

सुरेश राठोड आणि मारुती सातपुते हे दोघेही राज्य राखीव पोलीस दलाच्या वडसा तालुका मुख्यालयात तैनात होते. दोघांमध्ये काल रात्री काही कारणातून वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि सातपुतेने राठोडवर थेट चाकूहल्ला केला. सातपुतेच्या छातीत वार करण्यात आला होता. या हल्ल्यात जखमी सातपुतेला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

सदर प्रकरणाची चौकशी राज्य राखीव पोलीस दलाचे अधिकारी आणि गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलोल्पत करीत आहेत. देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सातपुतेचं पार्थिव कुटुंबाकडे सोपवण्यात येणार आहे. दरम्यान, दोघा जवानांमध्ये नेमका कोणत्या कारणातून वाद झाला, याबाबत अद्याप कळू शकले नाही. याप्रकरणी सखोल तपास सुरु आहे.

हे सुद्धा वाचा