वाजत गाजत वरात घेऊन वधूकडे चालले होते वऱ्हाडी, अचानक जे घडले त्याने सर्वच हादरले !

| Updated on: Feb 16, 2023 | 5:33 PM

विवाहास्थळाच्या जवळ येताच समोरुन एक भरधाव कार आली आणि वरातीत घुसली. या अपघातात एका महिलेचा जागीच ठार झाला. तर 20 हून अधिक वऱ्हाडी जखमी झाले. कार इतकी भरधाव होती की लोकांना बचाव करण्याची संधीच मिळाली नाही.

वाजत गाजत वरात घेऊन वधूकडे चालले होते वऱ्हाडी, अचानक जे घडले त्याने सर्वच हादरले !
पत्नीसोबत नाचणाऱ्या भावांना भावाने संपवले
Image Credit source: Google
Follow us on

महिसागर : वाजत गाजत वधूच्या घरी चाललेल्या वरातीत भरधाव कार घसुल्याने एकाचा मृत्यू झाला तर 20 हून अधिक वऱ्हाडी जखमी झाल्याची घटना गुजरातमधील महिसागर येथे घडली आहे. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेमुळे एका क्षणात आनंदाच्या दिवशी लग्नमंडपात शोककळा पसरली. महिसागर जिल्ह्यातील बालासिनोर येथे पेट्रोल पंपाजवळ ही घटना घडली.

नाचत वऱ्हाडी विवाहस्थळी चालले होते

बालासिनोरजवळ एका गेस्ट हाऊसमध्ये एक लग्न समारंभ पार पडणार होता. लग्नासाठी नवरदेव वाजत गाजत वरात घेऊन चालला होता. सर्व वऱ्हाडी उत्साहात नाचत विवाहस्थळी येत होते.

भरधाव कार वरातीत घुसली

विवाहास्थळाच्या जवळ येताच समोरुन एक भरधाव कार आली आणि वरातीत घुसली. या अपघातात एका महिलेचा जागीच ठार झाला. तर 20 हून अधिक वऱ्हाडी जखमी झाले. कार इतकी भरधाव होती की लोकांना बचाव करण्याची संधीच मिळाली नाही.

हे सुद्धा वाचा

जखमींना रुग्णालयात दाखल केले

घटनास्थळावरील आरडाओरडा ऐकून वधूकडील मंडळीही धावत आली. वधू आणि वराकडील मंडळींनी मिळून जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे लग्नमंडपात शोककळा पसरली.

आरोपी कारचालक फरार

घटनेनंतर आरोपी कारचालक तेथून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस कार चालकाचा शोध घेत आहेत.

राजस्थआनमध्ये बहिणीच्या लग्नाला चालेल्या भावांचा अपघात

बहिणीच्या लग्नासाठी चाललेल्या तीन भावाचा अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना राजस्थानमध्ये घडली आहे. तिघेही भाऊ जयपूरमध्ये शिक्षण घेत होते.

बहिणीच्या लग्नासाठी कारने जात असतानाच त्यांच्या कारमध्ये आणि बसमध्ये जोरदार धडक झाली. यामध्ये दोन भावांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला.