डिलिव्हरी बॉय नेहमीप्रमाणे जेवणाचे पार्सल घेऊन आला, घरातून दुर्गंधी येत होती म्हणून त्याने शेजाऱ्याने सांगितले आणि मग…

| Updated on: Apr 25, 2023 | 3:45 PM

नेहमीप्रमाणे डिलिव्हरी बॉल मायलेकिंचे पार्सल घेऊन आला. मात्र घराजवळ येताच त्याला दुर्गंधी येऊ लागली. ही बाब त्याने शेजाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर जे समोर आलं ते भयंकर होतं.

डिलिव्हरी बॉय नेहमीप्रमाणे जेवणाचे पार्सल घेऊन आला, घरातून दुर्गंधी येत होती म्हणून त्याने शेजाऱ्याने सांगितले आणि मग...
घरात दुर्गंधी येत होती म्हणून पोलिसांनी जाऊन पाहिले तर...
Image Credit source: Google
Follow us on

कोलकाता : दक्षिण कोलकात्यातील बिजॉयगड भागात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एक वृद्ध महिला आपल्या मुलीच्या मृतदेहासोबत घरी राहत असल्याचे उघडकीस आले आहे. मुलीचा मृतदेह सुमारे 2-3 दिवस घरात पडला होता. संचिता बसू असे महिलेच्या मृत मुलीचे नाव आहे. वृद्ध महिला मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. डिलिव्हरी बॉयचा जेव्हा महिलेचे पार्सल घेऊन आला तेव्हा सर्व घटना उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दरवाजा तोडून आत प्रवेश केला. आत महिलेच्या मुलीचा मृतदेह पडला होता. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

मायलेकी घरी एकट्याच रहायच्या

वृद्ध महिला आणि तिची मुलगी दोघी 2016 पासून घरी एकत्र रहायच्या. त्यांच्याकडे उत्पन्नाचे काहीच साधन नव्हते. शेजाऱ्यांशीही त्या बोलायच्या नाहीत. त्यांचा एक नातेवाईक त्यांना जेवण पाठवायचा. सोमवारी दुपारी नेहमीप्रमाणे डिलिव्हरी बॉय महिलेचे पार्सल घेऊन आला. महिलेच्या घराजवळ जाताच डिलिव्हरी बॉयला दुर्गंध आला. त्याने शेजाऱ्यांना ही बाब सांगितली. शेजाऱ्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.

पोलिसांनी दरवाजा तोडून पाहिले तर धक्काच बसला

माहिती मिळताच जादवपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत पाहिले असता त्यांना धक्काच बसला. महिलेच्या मुलीचा मृतदेह घरात पडला होता आणि वृद्ध महिला शेजारी बसली होती. यानंतर पोलिसांनी वृद्ध महिलेला मानसिक आणि शारीरिक उपचारासाठी कलकत्ता मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलिसांनी घराला सील ठोकले आहे. मुलीच्या मृत्यूबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा