जावयाच्या हत्त्येच्या आरोपात सासरचे लोकं सहा वर्षांपासून जेलमध्ये, जावई आढळला जिवंत

| Updated on: Nov 09, 2022 | 10:02 PM

झारखंडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जावयाच्या हत्त्येचा कट रचल्या प्रकरणी सासरचे तुरुंगात असताना जावई मात्र जिवंत आढळला आहे.

जावयाच्या हत्त्येच्या आरोपात सासरचे लोकं सहा वर्षांपासून जेलमध्ये, जावई आढळला जिवंत
Follow us on

पलामू (झारखंड),  झारखंडमधील पलामूमध्ये एका जावयाने (son in-law) स्वतःचे अपहरण आणि हत्येची खोटी (Fake Murder) योजना रचली, त्यानंतर पोलिसांनी सासूसह 8 जणांना अटक करून तुरुंगात पाठवले. आता तो जावई जिवंत आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  जावई राम मिलन चौधरी उर्फ ​​चुनिया, ज्याने स्वतःचे अपहरण करून बनावट हत्येचा कट रचला होता, तो जिवंत सापडल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. छतरपूर पोलिसांच्या मदतीने सातबरवा पोलिसांनी सोमवारी त्याला पकडले.

6 वर्षांपूर्वी रचण्यात आला होता कट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 3 सप्टेंबर 2016 रोजी राममिलन चौधरी उर्फ ​​चुनिया याचा भाऊ दिलीप चौधरी याने सासरच्या आठ जणांवर सातबरवा येथील पोंची गावात आपल्या भावाचे अपहरण करून खून केल्याचा आरोप केला होता.

या प्रकरणी राममिलनची पत्नी सरिता, सासू कलावती, सासरे राधा चौधरी, मुलीची बहीण, काका यांच्यासह कुदरत अन्सारी, लालन मिस्त्री आणि दानिश अन्सारी यांना पोलिसांनी अटक करून तुरुंगात पाठवले आहे. सध्या दानिश अन्सारी तुरुंगात आहे.

हे सुद्धा वाचा

मुलीचा भाऊ दीपक चौधरी याने सांगितले की, 2009 मध्ये सरिताचा विवाह नवा बाजार येथील राममिलन चौधरी याच्याशी हुंडा देऊन पूर्ण सामाजिक रितीरिवाजाने झाला होता. यादरम्यान सासरचे लोक जास्त हुंडा आणण्यासाठी बहिणीचा सतत छळ करत होते.

दीपक म्हणाला, ‘तुरुंगात जाण्याचा धक्का माझ्या वडिलांना सहन झाला नाही आणि त्यांचा मृत्यू झाला. दीपक चौधरीच्या म्हणण्यानुसार त्याने पोलिसांना सांगितले की, राममिलन जिवंत असून तो त्याच्या घरी येत राहतो.

यानंतर छतरपूर पोलिसांनी राममिलन चौधरी उर्फ ​​चुनिया याला भाव पुलियाजवळून अटक करून सातबरवा पोलिसांच्या ताब्यात दिले. सातबरवा पोलिस ठाण्याचे प्रभारी हृषिकेश कुमार राय यांनी अटकेला दुजोरा दिला आहे.

पोलिसांचे म्हणणे काय आहे?

या घटनेबाबत पलामूचे एसपी चंदन कुमार सिन्हा म्हणाले की, 2016 मध्ये तरुणाच्या पत्नीने 498ए (पतीकडून छळ) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता, ते टाळण्यासाठी तरुणाच्या कुटुंबीयांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.  पोलिसांची दिशाभूल झाल्याने या प्रकरणात अनेक जण तुरुंगातही गेले. आता आरोपीला पोलिसांनी अटक करून कारागृहात पाठवले आहे.