लुधियाना : रक्ताच्या नात्याला अलीकडच्या काळात रक्तरंजित स्वरूप लाभले आहे. अनेकदा नात्यातील लोक एकमेकांवर मालमत्ता किंवा अन्य कुठल्या कारणांवरून तुटून पडतात. यातून हत्यासारख्या गंभीर घटना घडत आहे. पंजाबच्या लुधियाना परिसरात देखील अशाच प्रकारे एका पित्याने त्याच्या मुलाची निर्घृण हत्या केली. ही घटना इतकी भयंकर आहे की मुलाची हत्या केल्यानंतर क्रूर सावत्र पित्याने त्या मुलाचा मृतदेह प्लास्टिकच्या ड्रममध्ये टाकला आणि सभोवती सिमेंटने प्लास्टर केले. या घटनेचे वृत्त ऐकून प्रत्येकाच्या अंगावर काटा उभा राहत आहे.
क्रूर सावत्र पित्याने मुलाला जीवे मारून ड्रममध्ये भरले. आपल्या कृत्याचा कुणाला थांगपत्ता लागू नये म्हणून आरोपीने खबरदारी घेतली होती. पण काही दिवसांनंतर मृतदेहाला दुर्गंधी येऊ लागली.
यादरम्यान मुलगा बेपत्ता असल्याने मुलाच्या आईला संशय आला. तिने लगेच शोधाशोध सुरू केले. तिला ड्रमभोवती केलेले प्लास्टर संशयास्पद वाटले. या संशयावरून तिने पोलिसांना माहिती दिली आणि त्यातून धक्कादायक हत्याकांडाचा उलगडा झाला.
सावत्र पित्यानेच मुलाची हत्या केली हे कळताच सर्वजण हादरले आहेत. हत्याकांडानंतर आरोपी फरार झाला असून, स्थानिक पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
आरोपीच्या क्रूर कृत्याचा कहर पाहायला मिळाला आहे. मुलाची हत्या केल्यानंतर आरोपीने त्याचे हातपाय बांधले आणि त्याला ड्रममध्ये पॅक केले. मुलाच्या आईने याबाबत पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे.
पहिल्या पतीचा मृत्यू झाल्यानंतर सविताने दीरासोबतच दुसरे लग्न केले होते. विवेकानंद मंडल उर्फ सपू मंडल असे या आरोपीचे नाव आहे. सविताला पहिल्या पतीपासून वीस वर्षांचा मुलगा होता. याच वीस वर्षीय पियुषची आरोपी विवेकानंदने हत्या केली.
आरोपी विवेकानंद याचे मुलगा पियुषसोबत वारंवार भांडण व्हायचे. पियुषला विवेकानंदचे वागणे पसंत नव्हते. त्यामुळे छोट्या मोठ्या गोष्टींवरून दोघांमध्ये नेहमीचा वाद व्हायचा.
मुलाच्या या सततच्या कटकटीला कंटाळून विवेकानंदने मुलाला कायमचा संपवण्याचा प्लान आखला. त्यातूनच त्याने हत्येची संपूर्ण तयारी केली. पूर्ण नियोजन करून त्याने हा कट रचला होता. त्यामुळे त्याच्या कृत्याचा सुरुवातीला काही तास कुणालाही मागमूस लागला नव्हता.
पण विवेकानंदच्या पत्नीने या कृत्याचा पर्दाफाश केलाच. काही दिवस मुलगा बेपत्ता होता. याबद्दल सविता विवेकानंदकडे चौकशी करायची. मात्र प्रत्येक वेळी तो उत्तर देण्यास टाळाटाळ करायचा. पोलीस सध्या फरार विवेकानंदचा शोध घेत आहेत. त्याला लवकरच अटक करू, असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.