पती-पत्नीचा जीव गेला, संशयाने पती-पत्नीचा संसार संपला !

| Updated on: Feb 23, 2023 | 11:27 AM

भुजंग कुटुंब मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असून, कमानिमित्त नाशिक येथे राहत होते. भुजंग तायडे हा पिठाच्या गिरणीत काम करत होता. भुजंगला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होते.

पती-पत्नीचा जीव गेला, संशयाने पती-पत्नीचा संसार संपला !
नाशिकमध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीला संपवले
Image Credit source: TV9
Follow us on

नाशिक / चैतन्य गायकवाड : चारित्र्यावरील संशयातून पतीने पत्नीची हत्या करत स्वतःही जीवन संपवल्याची खळबळजनक घटना बुधवारी सायंकाळी नाशिकमधील अंबड परिसरात घडली आहे. भुजंग अश्रू तायडे आणि मनिषा भुजंग तायडे अशी हत्या आणि आत्महत्या झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच अंबड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करत तपास सुरु केला. दोघांचेही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. पोलिसांनी या दोघांचे मोबाईल ताब्यात घेतले असून, या प्रकरणी अंबड पोलीस अधिक तपास करत आहेत.

आधी पत्नीला संपवले मग स्वतः आत्महत्या केली

नाशिकच्या अंबड चुंचाळे परिसरात तायडे पती-पत्नी कुटुंबासोबत राहत होते. पती भुजंग तायडे याला आपली पत्नी मनिषाचे दुसऱ्या पुरुषासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून त्याने बुधवारी सायंकाळी धारदार शस्त्राने वार करत पत्नीची हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर भुजंगने स्वतःही किचनमधील पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली.

मुले क्लासवरुन घरी आल्यानंतर घटना उघडकीस

सायंकाळी साडेसातच्या दरम्यान मुले क्लासवरुन आल्यानंतर दरवाजा उघडण्यासाठी त्यांनी दार ठोठावले, आईला आवजही दिला. मात्र बराच वेळ दार न उघडल्याने त्यांनी शेजाऱ्यांना सांगितले. शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून आत पाहिले असता आत दोघेही पती-पत्नी मृतावस्थेत आढळले. यानंतर नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.

हे सुद्धा वाचा

पती-पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून सुरु होते वाद

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून दोघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. भुजंग कुटुंब मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असून, कमानिमित्त नाशिक येथे राहत होते. भुजंग तायडे हा पिठाच्या गिरणीत काम करत होता. भुजंगला पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरु होते.