टवाळखोरांना कुणाचीच भीती नाही, पोलीस काय करताय? कोयते, तलवारी घेऊन ते चौकात आले आणि…

| Updated on: Feb 09, 2023 | 11:39 AM

मध्यरात्रीच्या वेळी शहरात पोलिसांची गस्त असतांना पोलीसांच्या हे टवाळखोर निदर्शनास कसे आले नाहीत, पोलीसांच्या गस्तीवरच यानिमित्ताने प्रश्न निर्माण झाले आहे.

टवाळखोरांना कुणाचीच भीती नाही, पोलीस काय करताय? कोयते, तलवारी घेऊन ते चौकात आले आणि...
Image Credit source: Google
Follow us on

मनोहर शेवाळे, टीव्ही 9 मराठी, मालेगाव : पुणे शहर त्यानंतर नाशिक शहर आणि आता मालेगाव शहरात ( Malegaon Crime ) टवाळखोरांनी मध्यरात्रीच्या वेळी धारधार शस्र घेऊन दहशत माजविण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. मालेगावमधील आझादनगर भागात 7 ते 8 जणांच्या टोळक्याने हातात तलवारी आणि कोयते घेऊन कुणाच्या तरी शोधात असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सुदैवाने टोळक्याच्या हाती कुणीही न लागल्याने मोठा अनर्थ टळली असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही ( CCTV ) कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मालेगावमधील ही संपूर्ण घटना समोर आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मध्यरात्रीच्या वेळी मालेगावात एका टोळक्याने धारधार शस्र घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, यानंतर संपूर्ण मालेगावात पोलीसांच्या रात्रीच्या गस्तीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सीसीटीव्हीमध्ये 7 ते 8 तरुण कुणाच्या तरी शोधत आझादनगर परिसरात फिरत असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सुरुवातीला काही टवाळखोर पायी आले तर काही टवाळखोर दुचाकीवर आले होते.

हे सुद्धा वाचा

29 जानेवारीच्या मध्यरात्री तोंडाला कापड लावून हे फिरत होते, त्यांच्या हातात धारधार शस्रही होते. घरांसमोर काही वेळ उभे राहिले आणि त्यानंतर तिथून निघून गेले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे.

हा संपूर्ण प्रकार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कळविण्यात आला असून त्यानंतर पोलीसांनी सीसीटीव्हीचा आधार घेत शोध सरू केला आहे. त्यामध्ये काही जणांची ओळख पटली असल्याची माहिती समोर आली आहे.

मालेगाव पोलिसांचे पथक संशयितांच्या शोधात आहे. पोलीस आपल्याला शोधत आहे अशी माहिती त्यांना मिळताच त्यांनी पळ काढला असून अज्ञात ठिकाणी लपून बसले आहे. त्यामुळे पोलिसांसमोर अडचणी वाढल्या आहेत.

मध्यरात्रीच्या वेळी शहरात पोलिसांची गस्त असतांना पोलीसांच्या हे टवाळखोर निदर्शनास कसे आले नाहीत, पोलीसांच्या गस्तीवरच यानिमित्ताने प्रश्न निर्माण झाले असून मालेगावकरांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुण्यासह नाशिक शहरात अशाच स्वरूपाची गुन्हेगारी फोफावत चालली आहे. सर्रासपणे कोयता तलवारी घेऊन शहरात मध्यरात्रीच्या वेळी फिरणे, दहशत निर्माण करत हल्ला करणे अशा घटना समोर येत आहे.

नुकताच नाशिक शहरातील अंबड परिसरात बहीण भावावर एका टोळक्याने कोयत्याने वार केले आहे. त्यामध्ये भाऊ आणि वहिन दोघेही गंभीर जखमी आहे.

तर दुसरिकडे पंचवटी पोलीसांनी हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून चार कोयते आणि एक चॉपर जप्त केले आहे. एकूणच गुन्हेगारीत कोयता, तलवारी वापरुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न दिसून येत आहे.