धौलपूर : पती-पत्नीमध्ये दररोज वाद होत होते. पतीने भावाला आपल्या वादाबाबत सांगितले. भावाने पत्नी आणि मुलीची हत्या करण्यासाठी पतीला प्रवृत्त केले. मग पतीने पत्नीसह 10 महिन्यांच्या मुलीची हत्या केली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यात ही घटना घडली. सीमा असे मयत पत्नीचे नाव आहे, तर बनवारी लाल असे आरोपी पतीचे नाव आहे. याप्रकरणी सीमाचा भाऊ नरेंद्र सिंह याने दिलेल्या तक्रारीवरुन बनवारीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. भावाच्या सल्ल्यामुळे एक संसार उद्धवस्त झाला आहे.
पत्नीचे आपल्या वडिलांसोबत अनैतिक संबंध होते, असा दावा आरोपीने केला आहे. यामुळे पत्नी आणि त्याच्यामध्ये वाद होते. ही बाब बनवारीने आपला चुलत भाऊ केदारला याबाबत सांगितले. चुलत भावाने त्याला पत्नी आणि मुलीला संपवण्याचा सल्ला दिला. यानंतर केदारनेच बनवारीला देशी कट्टा आणि जिवंत काडतूस आणून दिले. बनवारीने देशी कट्ट्याने गोळी झाडून पत्नी आणि मुलीला संपवले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनेचा तपास सुरु करत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरुन पतीविरोधात गुन्हा दाखल करत पतीला अटक केली. मात्र हत्येचा मास्टर माईंड केदार सिंह फरार झाला होता. पोलीस त्याचा शोध घेत रविवारी त्याला राजाखेडा बायपासवरुन अटक केली आहे. मयत महिलेचे खरंच सासऱ्यासोबत अनैतिक संबंध होते का याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. तपासाअंती सत्य उजेडात यईल.