ठाणे : नवरा बायकोच्या दोन गोष्टी घरोघरी होत असतात. काही पुरुष घरी दारू पिऊन येतात. त्यामुळे भांडण होतात. या भांडणातून मोठ्या दुर्घटना घडतात. अशीच एक दुर्घटना ठाणे येथे घडली. नवरा घरी दारू पिऊन यायचा. त्यानंतर तो पत्नीशी भांडण करायचा. टिटवाळामधील बल्यानी परिसराती ही घटना आहे. रोजच्या पतीच्या त्रासाला पत्नी कंटाळली होती. काय करावे काही सूचत नव्हते. २ ऑगस्ट रोजी या दोघांमध्ये भांडण झाले. भांडणात दोघांनीही एकमेकांवर हात उगारला. पण, पती दारू पिऊन टुन्न होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पतीचा मृतदेह सापडला.
तीन ऑगस्ट रोजी प्रवीण मोरे यांचा मृतदेह घरी सापडला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. त्यानंतर शवविच्छेदन अहवाल आला. त्यात गळा दाबून खून झाल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी पत्नी प्रणिता हिची कसून चौकशी केली. त्यानंतर तिने धक्कादायक खुलासा केला.
पती प्रवीण मोरे घरी दारू पिऊन येत असे. तो घरी आल्यानंतर भांडण करत असे. या रोजच्या भांडणाला कंटाळली होती. त्यामुळे पतीचा काटा काढल्याचे प्रणिता यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी प्रणिता यांना अटक केली आहे.
सुरुवातीला प्रणिता यांनी पोलिसांना काही सांगितले नव्हते. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर टिटवाळा पोलिसांनी पत्नी प्रणिता यांची कसून चौकशी केली. तेव्हा प्रणिता यांनी रोजच्या भांडणाला कंटाळून पतीचा गळा दाबल्याचं सांगितलं.
नवरा दारुडा असेल, तर किती दिवस त्रास सहन करायचा. असा सवाल पत्नीने पोलिसांना केला. पोलिसांनी प्रणिता यांना अटक केली. आता तिलाही जेलही हवा खावी लागणार आहे. पतीचा मृत्यू झाला आहे. एक कुटुंब उध्वस्त झाले आहे.