नाशिक : नाशिकच्या इंदिरानगर बोगद्याजवळ हवेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये मित्रानेच मित्राच्या डोक्याला बंदूक लावल्याने ही घटना चर्चेत आली असली तरी हवेत गोळीबार झाला तेव्हा गोळी बाहेर पडली होती, मात्र मित्राच्या डोक्याला लावून फायर करत असतांना बंदुकीतून गोळीच बाहेर न आल्याने थोडक्यात जीव वाचला आहे. मित्रांमध्ये देवांघेवणीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे प्राथमिक माहिती समोर आली आहे. मित्राकडूनच जीवे ठार मारण्याची धमकी देत गोळीबार केल्याची घटना समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. नाशिक शहरातील मुंबई नाका पोलिस ठाण्यात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मित्राला कार तीन दिवसासाठी दिलेली असतांना त्यांनी वेळेत न दिल्याने हा वाद प्रकार घडल्याचे तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे. मुंबई नाका पोलीसांनी लागलीच याबाबत घटनास्थळी जाऊन पंचनामा केला होता, त्यावरून गुन्हा दाखल करून घेत पुढील तपास सुरू केला आहे.
तक्रारदार अविनाश टिळे आणि त्याचा मित्र सुनील चोरमारे यांच्यात हा वाद झाला आहे. अविनाश याने सुनील याला काही दिवसांपूर्वी दोन लाख रुपये उसने दिले होते.
त्यामुळे दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यातच टिळे याने वर्षाच्या अखेरीस तीन दिवसांच्या बोलीवर सुनील चोरमारे याच्याकडून स्विफ्ट कार घेतली होती.
काही अडचणी मुळे अविनाश टिळे याला गाडी देणे शक्य झाले नव्हते, त्यामुळे दोन दिवस गाडी देण्यात उशीर झाला होता, त्यामुळे अविनाशने काही मित्रांना घेऊन ही गाडी देण्यासाठी आला होता.
सुनील हा त्याच्या मित्रांसमवेत तिथे असतांना गाडी देत असतांना त्याने हवेत गोळीबार केला आणि दुसऱ्यांदा अंगावर गोळीबार करत होता मात्र बंदुकीतून गोळी बाहेर पडली नाही.
त्यामुळे मोठी दुर्घटना होताहोती टळली असली तरी या घटनेची नाशिक शहरात जोरदार चर्चा असून मुंबई नाका पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष लागून आहे.