तिला माहीतच नव्हतं काळ आला… शॉपिंगच्या बहाण्याने जीव गेला; लहान मुलगा साक्षीदार बनलेल्या खून प्रकरणाची का होतेय चर्चा

| Updated on: Apr 29, 2023 | 11:17 AM

Wife Murder : पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती स्वत: पोलिसांकडे गेला आणि गुन्हा कबूल केला. हे ऐकून पोलिसही हैराण झाले आहेत.

तिला माहीतच नव्हतं काळ आला... शॉपिंगच्या बहाण्याने जीव गेला; लहान मुलगा साक्षीदार बनलेल्या खून प्रकरणाची का होतेय चर्चा
घरगुती वादातून पतीने पत्नीला संपवले
Image Credit source: freepik
Follow us on

बदायूं : उत्तर प्रदेशमध्ये (uttar pradesh) एका व्यक्तीने पत्नीची त्यांच्याच 5 वर्षांच्या मुलासमोर हत्या (husband killed wife) केली. हत्येनंतर पतीने कारसह पोलीस ठाणे गाठून संपूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेनंतर पोलिसांनाही धक्का बसला. आरोपी पतीने पत्नीवर दोन वेळा गोळ्या (fired bullets) झाडल्या होत्या. विशेष म्हणजे शॉपिंगला नेतो, असे सांगून पतीने पत्नीला बाहेर नेले व तिची हत्या केली. या घटनेनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.

मृत महिला फुरकाना हिचा रिजवानसोबत 10 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र पती-पत्नीमध्ये गेल्या 2वर्षांपासून वाद सुरू होता, या कारणावरून मयत महिला तिच्या माहेरी राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिलेच्या बहिणीचे लग्न होते, त्याची तयारी सुरू होती. तेव्हा आरोपी तेथे आला व त्याने पत्नीला सांगितले की तुझ्यासाठी व मुलांसाठी लग्नाचे कपडे वगैरे आणूया.असे सांगून तो तिला बाहेर घेऊन गेला. आणि रस्त्यातच तिची हत्या केली. संभल जिल्ह्यातील धनारी येथील रहिवासी असलेल्या फुरकानाचा विवाह 10 वर्षांपूर्वी बिलसी पोलीस स्टेशन हद्दीतील असौली गावात राहणाऱ्या रिझवानासोबत झाला होता. लग्नानंतर त्यांना 4 मुले झाली, मात्र 2 वर्षांपूर्वी पती-पत्नीमध्ये मतभेद झाल्याने पत्नी आपल्या माहेरच्या घरी राहू लागली

मृत महिलेच्या चुलत बहिणीचे लग्न शुक्रवारी होते, त्याच लग्नात अचानक नवरा आला आणि मुलांशी खेळत राहिला. त्याने पत्नीला सांगितले की चल तुझ्यासाठी आणि मुलांसाठी कपडे आणू. यानंतर वाटेत कार थांबवून त्यांनी पत्नीची त्यांच्या 5 वर्षाच्या मुलासमोरच पत्नीवर दोन गोळ्या झाडून तिची हत्या केली. हत्या केल्यानंतर पतीने पत्नीचा मृतदेह झुडपात फेकून दिला. या घटनेनंतर आरोपी गाडीसह पोलीस ठाणे गाठला आणि संपूर्ण घटना पोलिसांना सांगितली. पोलिसांनी महिलेच्या पालकांना या दुर्दैवी घटनेची माहिती दिली. मृता महिलेच्या पालकांनी मारेकरी जावयाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे, तर महिलेच्या लहान मुलाला पोलिसांनी पालकांच्या ताब्यात दिले आहे.

याप्रकरणी मृताच्या भावाने सांगितले की, त्याचा मेहुणा रिजवान, याने माझ्या बहिणीची हत्या केली. नवीन कपडे आणण्याच्या बहाण्याने पतीने तिला घरातून नेऊन हे निर्घृण कृत्य केले. लग्नाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण वातावरण शोकाकुल झाले आहे.