पत्नीला अभिनेत्री बनायचे होते, मात्र पतीच व्हिलन बनला; मग जे घडले त्याने सर्वच सुन्न झाले !

| Updated on: Feb 15, 2023 | 5:33 PM

मंगळवारीही दोघांमध्ये वाद झाला. यानंतर सोनियाने 112 नंबर डायल करत पोलिसांना बोलावले. पोलीस बाहेर उभे होते. याचदरम्यान गंगाने सोनियाला बहाणा करुन घरी बोलावले. यानंतर तिच्यावर गोळी झाडून गंगा फरार झाला.

पत्नीला अभिनेत्री बनायचे होते, मात्र पतीच व्हिलन बनला; मग जे घडले त्याने सर्वच सुन्न झाले !
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवले
Image Credit source: Google
Follow us on

मथुरा : घरगुती वादातून पतीने पोलिसांसमोरच पत्नीची गोळी झाडून हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशातील मथुरेत घडली आहे. पत्नीला अभिनेत्री बनायचे होते. मात्र पतीच खऱ्या आयुष्यात व्हिलन बनला अन् पत्नीचे अभिनेत्री बनण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. पत्नीची हत्या केल्यानंतर पती फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गंगा सिंह असे आरोपी पतीचे तर सोनिया सिंह असे मयत पत्नीचे नाव आहे. पती-पत्नीमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरु होता. याच वादातून ही हत्या करण्यात आली. पोलिसांसमोर घडलेले हत्याकांड आणि आरोपी फरार झाल्याने पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.

मयत पत्नीला अभिनेत्री बनायचे होते

सोनियाला अभिनेत्री बनायचे होते. या वेडापायी ती काही महिन्यांपूर्वी अभिनेत्री बनण्यासाठी गावातील काही तरुणांसोबत पळून गेली. त्यानंतर काही दिवसांनी सोनिया परत आली. परत आल्यानंतर तिने ज्या तरुणांसोबत पळून गेली होती त्यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली.

सोनियाच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तरुणांवर कलम 376 डी, 323, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. या कारणातून पती गंगा सिंह आणि पत्नी सोनिया यांच्यात भांडण सुरु होते.

घराबाहेर पोलीस उभे असतानाच पतीने पत्नीवर गोळी झाडली

मंगळवारीही दोघांमध्ये वाद झाला. यानंतर सोनियाने 112 नंबर डायल करत पोलिसांना बोलावले. पोलीस बाहेर उभे होते. याचदरम्यान गंगाने सोनियाला बहाणा करुन घरी बोलावले. यानंतर तिच्यावर गोळी झाडून गंगा फरार झाला. या घटनेत सोनियाचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी तात्काळ घटनेचा तपास सुरु केला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत. ही पथके आरोपीचा शोध घेत आहेत.