मोठ्या भावानेच दिली धाकट्याची सुपारी… कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

| Updated on: Apr 08, 2023 | 8:06 PM

चार दिवसापूर्वी एका बारावीच्या विद्यार्थ्याचा गावात मृतदेह आढळला. मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरु केला. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत प्रकणाचा उलगडा केला.

मोठ्या भावानेच दिली धाकट्याची सुपारी... कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का
अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या पत्नीचा पतीने काढला काटा
Image Credit source: Google
Follow us on

बागपत : उत्तर प्रदेशमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दररोज वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अनेक धक्कादायक गुन्हेगारी घटना घडत आहेत. बागपत जिल्ह्यातील बडौत पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घटनेनेही प्रचंड खळबळ उडाली आहे. मोठ्या भावाची लहान भावाने चक्क मारेकऱ्यांना सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमागील कारण हे तितकेच धक्कादायक असल्याने पोलीस चक्रावून गेले आहेत. मोठा भाऊ हा लहान भावाला सातत्याने शिवीगाळ करीत असायचा. इतकेच नव्हे तर तो त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य करायचा. या छळातून सुटका करुन घेण्यासाठी लहान भावाने हा मार्ग निवडला. छोट्या भावाने अन्य दोघांच्या मदतीने मोठ्या भावाची हत्या केली.

बारावीत शिकणाऱ्या यशचा चार दिवसापूर्वी सापडला मृतदेह

याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा मास्टरमाईंड लहान भावासह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे. यश असे मयत मोठ्या भावाचे नाव असून, वंश असे हत्या करणाऱ्या आरोपी भावाचे नाव आहे. कोतवाली बडौत ठाण्याअंतर्गत मलकापूर गावात 4 एप्रिल रोजी यशचा मृतदेह सापडला होता. यश हा बारावीत शिकत होता. त्याचा मृतदेह आढळल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली होती.

दोघांना अटक, दोघे अजूनही फरार

मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी वेगाने तपास करत अवघ्या तीन दिवसांतच हत्येचा उलगडा करण्यात यश मिळवले आहे. हत्या करण्यासाठी वापरलेली बंदुक पोलिसांनी जप्त केली आहे. छोट्या भावाने मित्रांच्या मदतीने आणि मित्रांना सुपारी देऊन मोठ्या भावाची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

हे सुद्धा वाचा

आरोपी वंश याने एका सराईत गुन्हेगाराला हत्या करण्यासाठी सुपारी दिली होती. त्यानुसार कट रचून यशला दारू पाजण्यात आली होती आणि त्यानंतर त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. यात यशचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर यशचा मृतदेह गावाबाहेर नदी पुलाच्या शेजारी फेकून देण्यात आला.

हत्याकांडानंतर कुटुंबीयांनी पोलिसांपुढे पत्करली शरणागती

यश याचा घरच्यांनाही तितकाच त्रास होता. छोट्या भावाला अनैसर्गिक कृत्य करून त्रास देत असे, तसेच तो त्याला आणि इतरांना शिवीगाळ करायचा. दररोजच्या त्रासाला कंटाळून आरोपी वंश याने यशची गोळी झाडून हत्या केली. या घटनेचा उलगडा होताच कुटुंबीयांनी तत्काळ पोलिसांपुढे शरणागती पत्करली. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून वंश आणि त्याच्या साथीदारांना अटक केली. तसेच अन्य दोन फरार आरोपींचा शोध सुरु आहे.