वाराणसी | 2 नोव्हेंबर 2023 : उत्तर प्रदेशातील वाराणसीमधील काशी हिंदू युनिव्हर्सिटी ( BHU ) कॅंपसमध्ये आपल्या मित्रा सोबत फिरणाऱ्या एका विद्यार्थींनीची एका टोळक्याने लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी रात्री घडला आहे. या गुंडाच्या टोळक्याने या तरुणीचे बंदुकीच्या धाकावर कपडे काढीत तिला निर्वस्र करीत तिचा व्हिडीओ देखील काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी गुरुवारी राजपूताना हॉस्टेल समोर धरणे आंदोलन करीत आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध वाराणसीतील काशी हिंदू युनिव्हर्सिटीतील एक विद्यार्थींनी बुधवारी रात्री आपल्या आयआयटी वसतीगृहातून निघाली होती. काही अंतरावर तिच्या मित्राची आणि तिची भेट झाली. त्यानंतर दोघे जण कर्मन बाबा मंदिराजवळ पोहचले असता त्यांना एका बाईकवरून आलेल्या तिघा जणांनी अडवले. यावेळी या विद्यार्थीनीचे तोंड दाबून तिला कोपऱ्यात नेले. आणि तिथे तिची कपडे काढून तिला निर्वस्र करीत तिचा व्हिडीओ बनविण्यात आला. नंतर तिचे फोटोही काढण्यात आले. पंधरा मिनिटे तिला डांबून ठेवत नंतर हे त्रिकूट तिला मोबाईल फोन घेऊन घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी लंका पोलिस ठाण्यात अद्यात आरोपी विरोधात आयपीसी कलम 354, 506, आणि आयटी कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरु करण्यात आली आहे.
हा प्रकार घडल्याने काशी हिंदू युनिव्हर्सिटी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी युनिव्हर्सिटी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करीत आंदोलन केले. या प्रकरणात कॅंपसमध्ये बाहेरील लोकांना प्रवेश करण्यास रोखावे आणि सुरक्षा व्यवस्था वाढविण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.