गणेश जाधव, TV9 मराठी, ठाणे : ठाणे स्टेशन रोड परिसरात विनयभंगाची एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. छेडछाडीला विरोध (Oppose to Molestation) करणाऱ्या तरुणीला मुजोर रिक्षाचालकाने चक्क रिक्षासह फरफटत नेल्याची घटना ठाण्यात आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. ही सर्व घटना परिसरातील सीसीटीव्हीत कैद (Incident Caught in CCTV) झाली आहे. या घटनेत तरुणी जखमी (Girl Injured) झाली आहे. रिक्षा चालक फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
रिक्षाचालकाने तरुणीला फरफटत नेले#Thane #AutoDriver #Molestation #CCTV pic.twitter.com/sRTMpswmYx
हे सुद्धा वाचा— TV9 Marathi (@TV9Marathi) October 14, 2022
पीडित तरुणी सकाळी नेहमीप्रमाणे कॉलेजला जात होती. यावेळी हा रिक्षाचालक तिथे आला आणि त्याने तरुणीला इशारे करत तिची छेडछाड काढली. तरुणीने त्याला विरोध केला असता त्याने त्या ठिकाणाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पळण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षाचालकाला तरुणीने पकडण्याचा प्रयत्न केला. रिक्षात बसलेल्या रिक्षाचालकाची कॉलर धरुन त्याला बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला. मात्र रिक्षाचालकाने रिक्षा सुरु करत तरुणीला फरफटत नेले.
काही वेळ फरफटत गेल्यानंतर तरुणी खाली पडली. यानंतर रिक्षाचालकाने पोबारा केला. या घटनेत तरुणी जखमी झाली असून, काही वेळ रस्त्यावरच पडून होती. काही नागरिकांनी त्या महिलेला उचलून बाजूला केलं.
या प्रकरणी रिक्षावाल्यालाविरोधात ठाणे नगर पोलीस ठाण्यात छेडछाड आणि विनयभंग असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे नगर पोलीस आरोपी रिक्षावाल्याचा शोध घेत आहेत.
घटनेची माहिती मिळताच भाजपचे स्थानिक माजी नगरसेवक यांनी देखील याबाबत पोलिसात धाव घेऊन मुलींला पाठिंबा दिला आहे. तसेच अनेक तक्रारी करून देखील प्रादेशिक परिवहन आणि वाहतूक विभाग कोणतीही दखल घेत नसल्यामुळे अशा मुजोर रिक्षावाल्यांना कधी धडा शिकवणार असा सवाल वाघुलेंनी केला आहे.