तुम्ही रेल्वे स्थानक परिसरात बुलेट पार्क करत असाल तर सावधान, बुलेट चोरणारी गँग सक्रिय

| Updated on: May 08, 2023 | 4:18 PM

कल्याण परिसरात चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नावच घेताना दिसत नाही. सध्या रेल्वे स्थानक परिसरातून बुलेट चोरण्याच्या घटना वाढत आहेत. यामुळे दुचाकीमालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

तुम्ही रेल्वे स्थानक परिसरात बुलेट पार्क करत असाल तर सावधान, बुलेट चोरणारी गँग सक्रिय
कल्याणमध्ये बुलेट चोर गँग सक्रिय
Image Credit source: TV9
Follow us on

सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण : कल्याण ग्रामीण भागातील रेल्वे स्थानक परिसरातून बाईक चोरीच्या घटनात सातत्याने वाढत आहेत. असं असताना पुन्हा टिटवाळा रेल्वे स्थानकातील तिकीट घरासमोर असलेल्या पार्किंगमधून महागडी बुलेट चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली आहे. हा बुलेट चोर सीसीटीव्हीत कैद झाला आहे. याप्रकरणी कल्याण तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरु केला आहे. तपासादरम्यान पोलिसांनी अनेक गुन्ह्यांची उकल केली आहे.

सकाळी बुलेट पार्क केली संध्याकाळी पाहिले तर गायब होती

कल्याण तालुक्यातील पिसे-आमने गावात राहणारा भावेश सुरेश शेलार हा ठाणे शहारत नोकरी करतो. सकाळी स्टेशन घरापासून लांब असल्याने तो बुलेटवरुन स्टेशनवरुन येतो. स्टेशन परिसरात गाडी पार्क करतो आणि लोकलने ठाण्याला जातो. नेहमीप्रमाणे तो 18 तारखेला सकाळच्या सुमारास तो घराजवळून बुलेट घेऊन निघाला होता. टिटवाळा रेल्वे स्थानकातून ठाण्याकडे जाणारी लोकल पकडून नोकरीच्या ठिकाणी गेला.

कल्याण तालुका पोलिसात तक्रार दाखल

बुलेट टिटवाळा रेल्वे स्थानकातील तिकीट घरासमोर असलेल्या दुचाकी पार्किंगमध्ये उभी केली होती. सायंकाळी सव्वा आठच्या सुमारास टिटवाळा रेल्वे स्थानकात पोहचून पार्किंगच्या ठिकाणी बुलेट घेण्यासाठी गेला होता. मात्र त्याला बुलेट पार्किंगमध्ये आढळून आली नाही. त्याने आजूबाजूच्या परिसरात बुलेटचा शोध घेतला. मात्र त्याला बुलेट सापडली नसल्याने त्याने कल्याण तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्याविरोधात बुलेट चोरीचा गुन्हा दाखल केला.

हे सुद्धा वाचा

चोरटा सीसीटीव्हीत कैद

पोलिसांनी तपास सुरु करत रेल्वे स्थानकातील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. सीसीटीव्हीत चोरटा बुलेट घेऊन जाताना कैद झाला आहे. मात्र 18 दिवस झाले तरी चोराला पकडण्यास पोलिसांना यश आले नाही. गेल्या 15 दिवसात 6 दुचाकीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. बुलेट चोरट्याचा शोध घेऊन त्याला लवकरच अटक केले जाणार असल्याचे टिटवाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.