भारताचे अब्जाधीश पंकज ओसवाल यांच्या कन्या वसुंधरा ओसवाल यांना 1 ऑक्टोबरपासून युगांडा पोलिसांनी अटक केली आहे. पंकज ओसवाल यांनी आपल्या कन्येला बेकायदेशीर रित्या अटक केलेली असून तिच्या सुटकेसाठी त्यांनी संयुक्त राष्ट्र संघटनेला देखील पत्र लिहीले आहे. वसुंधरा यांना त्यांच्या एक्स्ट्रा न्युट्रल अल्कोहल ( ईएनए ) प्लांट येथून शस्रधारी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एका बेपत्ता व्यक्तीच्या प्रकरणात त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे युगांडा येथील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
पंकज ओसवाल यांनी दावा केला आहे की त्यांच्या मुलीवर चुकीचे आरोप लावले आहेत. कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने कुटुंबाकडून 2 लाख डॉलरचे कर्ज घेतल्याने हे आरोप केले जात आहेत असे त्यांचे म्हणणे आहे. त्याने कर्जासाठी गॅरेंटर म्हणूनही काम केले होते. कर्मचाऱ्याने हे कर्ज भरण्यास नकार दिला आणि त्या वादातून वसुंधरा यांच्यावर खोटे आरोप लावल्याचे पंकज ओसवाल यांनी म्हटले आहे.
कंपनीच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार 26 वर्षांच्या वसुंधरा ओसवाल यांचे पालन-पोषण भारत, ऑस्ट्रेलिया आणि स्वित्झर्लंड येथे झाले आहे. त्यांनी स्वीस विद्यापीठात पदवी घेतली आहे. त्यांनी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षांत असताना पीआरओ इंडस्ट्रीजची स्थापना केली होती.आणि सध्या त्या फर्मच्या कार्यकारी संचालक आहेत. त्यांच्या कुटुंबानी दिलेल्या माहीतीनुसार वसुंधरा पूर्व आफ्रीकेत इथेनॉल उत्पादन उद्योगातील प्रमुख व्यक्ती आहेत, त्यांनी ओसवाल समुहाला जागतिक पातळीवर नेले आहे. त्यांच्या कामगिरीने त्यांना जागतिक युथ आयकॉन पुरस्कार मिळाला आहे. इकॉनॉमिक टाइम्स त्यांना सर्वश्रेष्ट महिला उद्योजक पुरस्कार दिलेला आहे.
इंस्टाग्रामवर वसुंधरा यांच्या बंधूंनी पोस्ट टाकली आहे. वसुंधरा माशी देखील मारु शकत नाही. ती सकाळी प्राण्यांना अन्न देते. आणि शाकाहारी आहे. ती दररोज ध्यान आणि योगसाधना करते. तिचा कोणी प्रियकर नव्हता.तिला अशा गोष्टीशी जोडले जात आहे ज्याचा तिच्याशी काही संबंध नाही असेही या पोस्टमध्ये म्हटले आहे.