लंडन : लंडनमध्ये एका भारतीय वंशाच्या ब्रिटीश तरुणीची हत्या (Indian Origin British Girl) झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ती राहत असलेल्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहातच हल्ला करुन तिची हत्या (Murder) करण्यात आली. या प्रकरणी स्कॉटलंड यार्डने एका ट्युनिशियन नागरिकाला अटक केली आहे. लंडनमधील (London) क्लर्कनवेल भागातील आर्बर हाऊसमधील स्टुडंट फ्लॅटमध्ये शनिवारी हल्ला झाल्याचा आरोप आहे. हल्ल्यात 19 वर्षीय सविता थनवानी हिच्या मानेला गंभीर जखमा झाल्या होत्या, मात्र तिचा मृत्यू झाला.
माहेर आणि सविता रिलेशनशीपमध्ये असल्याचे सांगितले जाते. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी 22 वर्षांच्या माहेर मारुफेच्या शोधासाठी तातडीने पथके रवाना केली होती. शनिवारी सविताचा मृतदेह सापडला, त्याच परिसरात माहेरला रविवारी अटक करण्यात आली.
“सविताच्या कुटुंबाला हत्या प्रकरणातील सर्व अपडेट्स देण्यात आले आहेत. आम्ही त्यांच्या दुःखात सहभागी आहोत, अशा भावना पोलिसांनी व्यक्त केल्या.
“सविता लंडन विद्यापीठातील शिकत होती. मारुफे सवितासोबत रिलेशनशिपमध्ये होता, पण तो विद्यार्थी नव्हता. तो ट्युनिशियाचा नागरिक आहे, मात्र त्याचा कोणताही निश्चित पत्ता नाही. शुक्रवारी ती प्रियकर मारुफेसोबत होती. ” असं या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
संबंधित बातम्या :
आमच्या घराला आग लावलेय, तरुणाचा मित्राला फोन; नवदाम्पत्यासह आठ जणांचे कोळसा झालेले मृतदेह सापडले
बारावीची परीक्षा द्यायला जेलबाहेर आला आणि रोहन नाईकचा खून केला!
तू माझा मुलगा नाहीस, 17 वर्षीय मुलाला बापाने हिणवलं, लेकाने जीवच घेतला