जखमी सैफला मुलाने ऑटो रिक्षातून लीलावतीत नेले, हल्ल्यानंतर काय घडलं नेमकं?

| Updated on: Jan 16, 2025 | 5:55 PM

बॉलीवूडसह अनेक नामीगिरामी हस्तींचं निवासस्थान असणाऱ्या वांद्रे परिसरातील उच्चभ्रू वस्तीत सैफ अली खान याच्या घरात अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर अत्यंत जवळून हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर या घटनेचा क्रम उघडकीस आला आहे. नक्की रात्री काय घडले ...

जखमी सैफला मुलाने ऑटो रिक्षातून लीलावतीत नेले, हल्ल्यानंतर काय घडलं नेमकं?
Follow us on

बॉलीवूडच्या मागे लागलेले शुल्ककाष्ठ संपण्याचे काही नावच घेत नाही. अभिनेता सैफ अली खान याच्या वांद्र्याच्या उच्चभ्रू वस्तीत चोराने त्याचावर जीवघेणा हल्ला केल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे. सैफ अली याच्यावर तातडीने शस्रक्रिया करून त्याच्यावर उपचार सुरु केले आहेत. त्याची प्रकृती आता स्थिर आहे. परंतू या हल्ल्यानंतर सैफ अली खान याच्या इमारतीला कोणतेही संरक्षण नसल्याचे उघड झाले आहे. या चोराने सहा वार केल्याचे उघड झाले आहे. यातील दोन जखमा गंभीर असल्याचे म्हटले जात आहे. सैफ अली खान गंभीर जखमी झाल्यानंतर त्याचा मुलगा इब्राहिम अली खान याने जखमी सैफला लीलावती नेल्याचे उघड झाले आहे.

सैफ अली खान याच्या घरात चोर शिरल्यानंतर घरातील मोलकरणीने आरडाओरड केल्यानंतर सैफ अली खान याच्याशी त्याची झटापट झाली यात चोराने त्याच्यावर चाकूने सहा वार केल्याचे उघड झाले आहे. त्यानंतर जखमी सैफ याला इस्पितळात नेण्यासाठी वाहनाचा ड्रायव्हर उपलब्ध नसल्याने सैफ याचा मुलगा इब्राहम अली खान याने त्याला उचलून रिक्षात टाकून लीलावती रुग्णालयात नेल्याचे म्हटले जात आहे.

बॉलीवूडचा अभिनेता सैफ अली खान याच्यावर बुधवारी रात्री एका अज्ञात व्यक्तीने घरात घुसून हल्ला केल्याचे उघडकीस आले आहे. या अज्ञात व्यक्तीचे घरातील मोलकरणीशी वाद झाले. त्यानंतर ती ओरडू लागल्याने मुलाच्या बेडरुममध्ये झोपलेला सैफ बाहेर आला त्यानंतर या व्यक्तीशी त्याची झटापट झाली. यात अज्ञात व्यक्तीने सैफवर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात मोलकरीण देखील जखमी झाली आहे. सैफवर एकूण सहा वार झाले असून त्यातील दोन वार खूप खोलवर असून त्याच्यावर लीलावतीत शस्रक्रिया झाली आहे.

हे सुद्धा वाचा

रात्री दोन वाजता हल्ला

मुंबई क्राईम ब्रँचने सैफ अली खान याच्या घरी काम करणाऱ्या महिला स्टाफची चौकशी सुरु केली आहे. सीसीटीव्ही फूटेज तपासून अज्ञात चोराचा फोटो उघड केला आहे. हा हल्ला गुरुवारी रात्री २ वाजताच्या सुमारास झाला. या हल्ल्यावेळी सैफ आणि करीना तसेच त्यांची दोन्ही मुले घरी होती. हल्ल्यानंतर पोलीसांनी फोन करुन माहिती देण्यात आली. मुंबई पोलिसांच्या मते आरोपी हल्ल्याच्या आधी काही तास आधीच घरात हजर होता. हा आरोपी नेमका घरात घुसला करा याचे गौडबंगाल कायम आहे. पोलिसांनी २५ ते ३० सीसीटीव्हींची छाननी केली आहे.

चाकूचे पाते अडकले होते

सैफ अली यांच्यावर महत्वाची शस्रक्रिया केली आहे, सैफच्या हाडात २.५ इंचाचा चाकूचा तुकडा अडकला होता. त्यास सर्जरीकरुन काढून टाकले आहे. त्याच्या शरीरावर सहा जखमा झाल्या असून दोन जखमा तीव्र स्वरुपाच्या आहेत अशी माहिती सीओओडॉक्टर नरीज उत्तमानी यांनी दिली आहे.