वॉशिंग्टन : प्रेम व्यक्त करण्याचे उत्तम माध्यम म्हणजे जोडीदाराला प्रेमाने केलेला किस( kiss) अर्थात चुंबन. किस करण्याचा व्यक्तीच्या मानसिक स्वास्थ्यांवर देखील परिणाम होतो. किस घेतल्याने मूड चांगला राहतो आणि समोरच्या व्यक्तीसोबतचे नाते अधिक घट्ट होते. म्हणूनच किस करणे मानसिक आणि शारीरिक स्वास्थासाठी चांगले असते. मात्र, किस घेतल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अमेरिकेत(US) घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
हे धक्कादायक प्रकरण अमेरिकेतील टेनेसी जेलमध्ये घडले आहे. जेलमध्ये भेटायला आलेल्या एका मैत्रिणीने किस केल्याने कैदाचा मृत्यू झाला आहे. जोशुआ ब्राउन असे मृत कैद्याचे नाव आहे. ड्रग्जच्या औव्हरडोसमुळे कैदाचा मृत्यू झाला आहे.
या प्रकरणी रेचेल नावाच्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. टीडीओसीने मंगळवारी एक निवेदन जारी करत याबबात माहिती दिली. टर्नी सेंटर इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्समध्ये ड्रग तस्करी आणि मनुष्यवधाचा आरोपा प्रकरणी त्याला अटक करण्यात आलेय. मृत कैदी जोशून ब्राउनला ड्रग्जशी संबंधित प्रकरणात 11 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. 2029 मध्ये त्याची शिक्षा संपणार होती. मात्र, त्याआधीच त्याचा मृत्यू झाला आहे.
मृत जोशून ब्राउन पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये त्याच्या शरीरात 14 ग्रॅम ड्रग्ज सापडले आहे. ड्रग्जच्या ओव्हरडोजमुळे ब्राउनचा मृत्यू झाला आहे. रेचेल ब्राऊनला भेटण्यासाठी जेलमध्ये आली होती. यावेळी तिने त्याला किस करण्याच्या बहाण्याने त्याच्या तोंडात ड्रग्ज टाकले. रेचेल गेल्यानंतर काही वेळातच या कैद्याची प्रकृती बिघडली. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे समजते.
याशिवाय याआधीही रेचेलने ब्राउनला भेटण्याच्या बहाण्याने ड्रग्स दिल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला आहे. रेचलने चौकशीदरम्यान पोलिसांना ब्राऊनला ड्रग्ज देण्याची कबुली दिली आहे.
या घटनेनंतर जेल प्रशासनाने कारागृहतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. यापुढे कारागृहात कैद्यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांवर नजर ठेवली जाणार आहे. तसेच त्यांच्याकडील सर्व वस्तुंची देकील तपासणी केली जाणार आहे. कैद्यांना भेटायाला येणाऱ्यांकडे काही वस्ती असतील तर त्या बाहेरच ठेवल्या जाणार आहेत. जेलमध्ये खाण्या पिण्याच्या व्सतू नेण्यास मनाी करण्यात आली आहे.