नाशिक : नाशिकच्या उपनगर पोलीसांनी केलेल्या एका कारवाईने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नाशिक शहरातील जयभवानी रोड परिसरातील किरण पाटील याला नाशिकच्या उपनगर पोलीसांनी अटक केलेल्या आरोपीने मोठ्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. घरफोडी करत 16 तोळे सोन्याचे दागिने आणि घराच्या बाहेर उभी असलेली बुलेट चोरी केल्याची कबुली दिली आहे. हा सर्व मुद्देमाल नाशिकच्या उपनगर पोलीसांनी हस्तगत केला आहे. नाशिकच्या जेलरोड परिसरात राहणाऱ्या राहुल डगळे यांच्या घरात घरफोडी झाली होती. त्यामध्ये बंद घराचे कुलूप तोडून दागिने आणि बुलेट चोरल्याची तक्रार उपनगर पोलिसांत दाखल करण्यात आली होती. विशेष म्हणजे चोराने घराच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरी केला होता. उपनगर पोलीसांच्या पथकाला या गुन्ह्याचा उकल करत असतांना मोठे आव्हान होते मात्र परिसरातील सर्वक सीसीटीव्ही तपासात असतांना त्यात संशयित पाटील यामध्ये दिसला होता.
घरफोडीच्या कारवाई अटक केलेला संशयित आरोपी किरण पाटील याच्यावर उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरीच्या गुन्ह्यांची नोंद असून काही दिवसांपूर्वी कारागृहातून बाहेर आला आहे.
संशयित किरण पाटील याने विविध गुन्ह्यांची कबुली दिल्याने पोलीसही चक्रावून गेले आहे. चोरीचा व्यवसाय थाटला होता की काय असा अजब सवाल पोलीस ठाण्यातील पोलिसांना पडला आहे.
नाशिक शहरातील विविध पोलीस ठाण्यात घरफोडी, सोनसाखळी चोरी, दुचाकी चोरीच्या घटना घडत असतांना त्यांचीही पोलीसांनी उकल करावी अशी मागणी होऊ लागली आहे.
महिलांना लक्ष्य करत दागिने चोरी करण्याच्या गुन्ह्यांत वाढ झाली असून जुने सीबीएस आणि द्वारका सर्कल येथे बसने प्रवास करणाऱ्या महिलांच्या पर्समधील सोन्याचे दागिने आणि रक्कम चोरीची घटना घडली आहे.
नाशिक शहरात खून, दरोडे, घरफोड्या, दुचाकीसह चारचाकीची चोरी अशा विविध घटना घडत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून चोरीचे विविध ट्रेंड समोर येऊ लागले आहे.