सुनील ढगे, नागपूर : नागपूर ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत घरफोडी करणाऱ्या एका आंतरराज्यीय गॅंगचा पर्दाफाश करण्यात यश मिळवले आहे. आरोपींकडून 18 लाख रुपयांचे सोने चांदीचे दागिन जप्त करण्यात आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे आोरपींकडून आतापर्यंत 21 गुन्हे उघड झाले आहेत. ही गॅंग फक्त दिवसाच्या वेळी घरफोडी करायची. या टोळीतील मुख्य आरोपी हा राजस्थानमधील असून, तो गेल्या काही वर्षापासून नागपूर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी रहायचा. आरोपींकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने पोलीस पुढील तपास करत आहेत.
नागपूर ग्रामीण पोलिसांच्या हाती एक आंतरराज्यीय घरफोडी करणारी टोळी लागली. या टोळीची विशेषता म्हणजे हे ग्रामीण भागामध्ये कमी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या घरात भरदिवसा चोरी करायचे. यांनी आतापर्यंत नागपूर ग्रामीणमध्ये 16 घरफोड्या केल्या, तर इतर जिल्ह्यात सुद्धा यांनी घरफोड्या केल्या आहेत. आतापर्यंत 21 गुन्ह्यांची उकल या टोळीकडून झाली आहे. या टोळीकडून 18 लाख 69 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये त्यांनी चोरलेले सोन्या चांदीचे दागिने वितळवून ते त्याचे शिक्के बनवायचे.
नागपूर ग्रामीण पोलिसांना या टोळीला पकडण्यात मोठा यश आलं आहे. यामुळे ग्रामीण भागात वाढलेल्या घरफोडीच्या घटनांवर अंकुश लावण्यात यश मिळालं आहे. पोलीस आता यांच्या काही साथीदारांचा आणि सोने चांदीचे दागिने हे कुठे विकायचे याचा शोध घेत आहेत.
नाशिक शहर आणि परिसरात घरफोडी करणाऱ्या एका टोळीला नाशिक पोलिसांनी धुळे येथून सापळा रचून अटक केली आहे. या टोळीकडून 21 लाखांचे दागिने आणि मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. शहरातील पंचवटी येथील एक रिक्षाचालक बंद घरांची रेकी करून ती माहिती धुळे येथील मित्रांना देत होता. अंबड पोलिसांनी त्याची चौकशी केली असता, पोलिसांनी धुळे येथून काही संशयितांना ताब्यात घेत चौकशी केली. या टोळीने शहरात वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडी केल्याचे उघड झाले.