सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जलसंपदा मंत्री आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पाच वर्षापुर्वी गुन्हा दाखल झाला होता. रस्त्यावर ठिय्या मांडल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार समन्स देवूनही न्यायालयात हजर न राहिल्याने त्यांना वारंट (Warrent) काढले होते. याप्रकरणी आमदार जयंत पाटील यांनी न्यायालयात हजर राहून वारंट रद्द करत जामीना (Bail)ची पुर्तता केली आहे. जयंत पाटील यांच्या राजकीय जीवनात प्रथमच त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला असून त्यांना जामीनासाठी स्वतः न्यायालयात हजर राहण्याची वेळ आली.
जिल्हा परिषद निवडणुकीवेळी जयंत पाटील यांनी शिगाव येथे रस्त्यावरच ठिय्या मांडला होता. मुंबई पोलिस अधिनियमानुसार जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी आष्टा पोलिसात जयंत पाटील यांच्यासह स्वरुपराव पाटील, मधुकर पाटील, रणजित पाटील, शरद गायकवाड, मोहन गायकवाड, राजेंद्र भासर, विलासराव शिंदे, जितेंद्र पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी इस्लामपूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या कोर्टात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. त्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर वारंवार समन्स देवूनही न्यायालयात हजर न राहिल्याने जयंत पाटील यांना वारंट काढले होते. आज दुपारच्या सुमारास जयंत पाटील इस्लामपूर न्यायालयात हजर राहिले होते. जयंत पाटील यांनी न्यायालयात हजर राहून वारंट रद्द करत जामीनाची पुर्तता केली आहे. (Islampur court issued warrant to former water resources minister Jayant Patal)