शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत हत्तीचे हस्तीदंत तस्करी करणारी टोळी (An ivory smuggling gang arrest) गजाआड केली आहे. तब्बल 20 लाखाचे दोन हस्ती दंत पोलिसांनी जप्त (Seized) घेतले आहेत. यामध्ये चार जणांना कवठेमहांकाळ पोलिसांनी अटक (Arrested by Kavathemahankal police) केली आहे. कवठेमहांकाळ पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली.
चार जण हस्तीदंत घेऊन येणार असल्याची गुप्त माहिती कवठेमहांकाळ पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ पोलिसांनी सापळा रचला.
यावेळी खरशिंग ते दंडोबा डोंगराकडे जाणाऱ्या रोडलगत गिरनार तपोवन मठाच्या येथे झाडाझुडपात हत्तीचे हस्त दंत घेऊन थांबलेले आढळून आले. कवठेमहांकाळ पोलिसांनी या चार आरोपींना अटक केली आहे.
कोल्हापूर येथून हस्ती दंत घेऊन येणारे दोन आरोपी आणि सांगलीमधील खरेदीदार दोन आरोपी असे चार आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. चारही आरोपींवर वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटकमध्ये तपास करून आणखी कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उप अधीक्षक मनीषा डुबले यांनी सांगितले. अटक केलेले आरोपी राहुल रायकर, बालाजी बनसोडे हे दोघे कोल्हापुरमधील तर कासीम काझी हा मिरज आणि हणमंत वाघमोडे हा कर्नाटकमधील रहिवासी आहेत.
कवठेमहांकाळ पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ पोलिसांच्या या धडाकेबाज आणि धक्कादायक कारवाईमुळे जिल्ह्यातील सर्वच स्तरातून पोलिसांचे कौतुक होत आहे.