Video : ओव्हरटेक केले म्हणून एसटी बस चालकाला मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: Jul 29, 2022 | 12:57 PM

या प्रकऱणात नेमकी चुकी कोणाची आहे. हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कारण पण व्हिडीओत दिसत असलेल्या तीन तरूणांवरती पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Video : ओव्हरटेक केले म्हणून एसटी बस चालकाला मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
ओव्हरटेक केले म्हणून एसटी बस चालकाला मारहाण, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Image Credit source: tv9marathi
Follow us on

जळगाव : जळगावच्या (Jalgaon) चाळीसगावमध्ये (Chalisgaon) बस चालकाला (Bus Driver) काही तरुणांकडून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ओव्हरटेक केले म्हणून तीन तरुणांनी चाळीसगाव आगाराचे बस चालक आबा नालकर यांना दहीवद गावाजवळ बस थांबून शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आहे. या तीन तरुणांविरोधात मेहुनबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हे तीनही तरुण अद्याप फरार आहे. पोलिस या तरुणाचा शोध घेत आहेत. महाराष्ट्रात आत्तापर्यंत अनेक अशा घटना घडल्या आहेत. त्यामध्ये एसटी चालकाला मारहाण करण्यात आली आहे. आता पोलिस आरोपींवरती कोणती कारवाई करणार हे पाहावं लागेल.

नेमकं व्हिडीओमध्ये काय आहे

एसटीचा चालक आपली गाडी चालवत असताना, त्याने ओव्हरटेक केले त्यामुळे संतापलेल्या तिघांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. ही घटना दहीवद गावाजवळ घडली आहे. ज्यावेळी ही घटना घडली. त्यावेळी तिथं अनेक नागरिक जमा झाले होते. तरुणांनी एसटी थांबवली त्यानंतर जाब विचारत ड्राईव्हरला मारहाण केली आहे. संबंधित गावातील लोक सुध्दा आहेत. परंतु त्यापैकी कोणीही तरुणाला अडवताना दिसत नाही. चालकाने आपली जागा सोडली नाही तरी सुध्दा तरूणांनी मारहाण केली आहे. ही व्हिडीओ एसटीच्या आतमध्ये असलेल्या एका प्रवाशाने त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओवरून पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

या प्रकऱणात नेमकी चुकी कोणाची आहे ?

या प्रकऱणात नेमकी चुकी कोणाची आहे. हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कारण पण व्हिडीओत दिसत असलेल्या तीन तरूणांवरती पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिस तरुणांचा शोध घेत आहेत. परंतु तरुण कोणत्या परिसरातले आहेत हे अद्याप समजलेले नाही. आरोपी ताब्यात घेतल्यानंतर खरं प्रकरण काय आहे हे उघडकीस येईल. बस चालकाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. डोक्यावर मारहाण झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.