जळगाव : तालुक्यातील वसंतवाडी (vasantwadi) येथे तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा तलावाच्या (lake) पाण्यात बुडाली आहे. त्या व्यक्तीचं नाव रमेश भिका चव्हाण वय (४२) असे आहे. ती व्यक्ती तिथं बुडाल्यापासून पोलिस प्रशासन आणि इतर पथक त्यांचा शोध घेत आहे. परंतु त्यांचा अद्याप कसल्याची प्रकारचा शोध लागलेला नाही अशी माहिती पोलिसांनी (police) दिली आहे. त्या परिसरातील आणि गावकऱ्यांना सुध्दा या प्रकरणामुळे धक्का बसला आहे. तलावात मगरी असल्याचा अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे पोलिसांनी त्या पद्धतीने शोध सुरु केला आहे.
वसंतवाडी येथील तलावात भुलाबाई विसर्जनासाठी काही मुली सोमवारी सायंकाळी 5 वाजता गेलेल्या होत्या. त्यावेळी ठिकाणी रमेश चव्हाण हे तलावामध्ये पोहत होते. अचानक ते तलावाच्या पाण्यात बुडून बेपत्ता झाले. विसर्जनासाठी आलेल्या मुलींनी हा प्रकार पाहिला त्यामुळे घटना उघडकीस आली. त्या मुलींनी हा प्रकार गावातील लोकांच्या कानावर घातला. गावकऱ्यांनी पोलिस प्रशासन आणि अग्निशमक दलाला ही माहिती दिली.
सध्या घटनास्थळी महसूल व पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पथक मृतदेह शोधत असल्याचे पाहायला मिळाले आहे. आज सकाळी 8 वाजल्यापासून त्यांनी शोध मोहीम सुरू केली आहे. 18 तासांच्या वर कालावधी होऊनही त्या व्यक्तीचा शोध अद्याप लागलेला नाही.
एखादी व्यक्ती पाण्यात बुडाल्यानंतर १२ तासाने बुडत्या व्यक्तीचा मृतदेह पाण्यावरती तरंगू लागतो. परंतु पाण्यात बुडालेल्या व्यक्तीचा शोध न लागल्यामुळे संपूर्ण गावकरी टेन्शनमध्ये आहेत. अनेकांनी तलावात मगर असल्याचा संशय व्यक्त केला आहे.