सांगली : सांगलीत सराफाने आत्महत्या केली आहे. या प्रकरणी आठ जणांवर गुन्हा दाखल (Jeweller Commit Suicide) करण्यात आला आहे. पैसे आणि सोन्याच्या देवाण-घेवाणीतून सराफाची फसवणूक झाली. त्यामुळे त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे (Jeweller Commit Suicide).
पैसे आणि सोन्याच्या देवाण-घेवाणीतून सराफ हरीशचंद्र खेडेकर यांची फसवणूक करण्यात आली. याबाबत सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. त्यानंतर सराफ हरीशचंद्र खेडेकर (वय 82) यांनी त्यांच्या दुकानातच गळफास घेत आत्महत्या केली. सुसाईड नोटमध्ये त्यांनी आठ जणांची नाव ठेवली लिहून होती. त्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मधुकर खेडेकर, श्रीकांत उर्फ बाळू खेडेकर, सदानंद खेडेकर, प्रकाश खेडेकर, राजू शिरसाट, वैभव पिराळे, दिवाकर पोतदार, सुनिल पंडित यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी मृत खेडेकर यांची मूलगी तेजस्विनी बेलवलकर यांनी तक्रार दिली आहे (Jeweller Commit Suicide).
सर्व संशयितांचे पैसे देवाण-घेवाणीचे व्यवहार होते. शिवाय, यातील काहींनी मृत खेडेकर यांनाही कर्ज दिले होते. या देवाण-घेवाणीतून फसवणूक झाली आहे. तसेच, अव्वाच्या-सव्वा व्याज लावून कर्जही वसूल केले. या व्यवहारातून खेडेकर यांनी मानसिक त्रास देऊन धमकी दिल्याने त्यांनी अखेर कंटाळून त्यांनी आत्महत्या केली आहे, असं तक्रारीत म्हटलं आहे.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत खेडेकर यांनी आठ जणांची नावे लिहून ठेवली होती. तसेच, त्यांनी दिलेल्या मानसिक त्रासाबाबतही उल्लेख ही केला आहे. त्यावरुन पोलिसांनी या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
परळीची तरुणी, पुण्यात आत्महत्या, विदर्भातल्या मंत्र्याचं कनेक्शन? चौकशीसाठी भाजप आक्रमक https://t.co/4apE2xkd2X #Pune | #Parli | #Beed | #PoojaChavan | #PuneSuicide | @BJP4Maharashtra
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 11, 2021
Jeweller Commit Suicide
संबंधित बातम्या :
चार दिवस दारु पाजून आदिवासी महिलेची गँगरेप करुन हत्या, पोलिसांनी शिताफीने आरोपींना पकडलं
कोल्हापुरात राजाराम तलावाजवळ आढळलेल्या वृद्धेच्या छिन्नविच्छिन्न मृतदेहाचं गूढ उकललं
कुर्ल्यातील ड्रग्ज व्यापाऱ्याला लग्नमंडपातच अटक; एनसीबी अधिकाऱ्यांनी त्याला ‘सिंगल’च ठेवलं