फॉगसिटी हादरली ! लाखों रुपयांचे दागिने लंपास…दोन घरांवर दरोडे

| Updated on: Oct 16, 2022 | 1:44 PM

मध्यरात्री वेळी दरोडे टाकत असतांना त्यांच्याकडे तलवारी, कोयते आणि लाकडी दांडके असल्याने पोलिसांचा धाक शिल्लक राहिला नाही का ? अशीही चर्चा सुरू झाली आहे.

फॉगसिटी हादरली ! लाखों रुपयांचे दागिने लंपास...दोन घरांवर दरोडे
Image Credit source: TV9 Network
Follow us on

शैलेश पुरोहित, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, इगतपुरी ( नाशिक ) : नाशिकच्या घोटी परिसरातील (Nashik Ghoti Crime) दोन घरांवर सशस्त्र दरोडा (Igatpuri Robbery) पडल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यामध्ये लाखों रुपयांचे दागिने आणि रोख रक्कमेची लूट केली आहे. यावेळी दरोडेखोरांनी पुरुषांवर तलवारीने वार केले तर लहान मुलांच्या अंगावर असलेले दागिने देखील लुटले आहे. घोटी परिसरात राहणारे भधे आणि खान कुटुंबाच्या घरी दरोडा टाकला गेला आहे. मध्यरात्री दरोडा पडताच जखमी झालेल्या नागरिकांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरोडा पडल्यानंतर मध्यरात्री पोलीस अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले होते. संपूर्ण घटनेचा पंचनामा देखील करण्यात आला आहे. या दरोडेखोरांच्या अटकेसाठी संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली होती. मात्र अद्यापही दरोडेखोर हाती लागले नाहीत. दरोडे टाकणारी टोळी यांच्याबाबत जखमींकडून माहिती घेतली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून अद्यावयत यंत्र-सामुग्री वापरुन सशस्र दरोडा टाकण्याच्या आणि चोरीच्या घटना समोर येत आहे.

दरोडेखोर किंवा चोर हे हत्यारबंदी असल्याने नागरिक त्यांना प्रतिकार करणे टाळत आपल्याकडील सोने – पैसे हे देऊन जीव वाचवतात.

हे सुद्धा वाचा

पोलीसांच्या आसपासच या दरोडेखोरांचा वावर असतो की काय अशीही शंका नागरिक उपस्थित करतात, त्याचे कारण म्हणजे भरवस्तीत दरोडे आणि चोरीच्या घटना घडत आहे.

नाशिकच्या इगतपुरी येथील घटना देखील अशाच स्वरूपाची आहे, मध्यरात्री झालेले दोन दरोडे हे नागरिकांमध्ये खळबळ उडवून देणारे आहे.

ठिकठिकाणी जिल्ह्याच्या हद्दीवर असणारे पोलीस नाकाबंदी दरम्यान काय करतात असाही सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

इगतपुरी तालुक्यातील ही घटना, नाशिकच्या ग्रामीण पोलीसांसमोर दरोडयाचे एक मोठे निर्माण झाले असून पोलीसांच्या कारवाईकडे लक्ष लागून आहे.

मध्यरात्री वेळी दरोडे टाकत असतांना त्यांच्याकडे तलवारी, कोयते आणि लाकडी दांडके असल्याने पोलिसांचा धाक शिल्लक राहिला नाही का ? अशीही चर्चा सुरू झाली आहे.