झारखंड : झारखंड राज्याची राजधानी असलेल्या रांची येथे एक खळबळजनक घटना घडली. नवऱ्याने आपल्या बायकोवर चक्क मुद्दामून ऍसिड फेकलं. यात त्याची बायको गंभीररीत्या जखमी झालीय. उलट्या काळजाचं हे कृत्य करणारा नवरा सध्या फरार आहे. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीचा शोध घेतला जातोय. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या त्याच्या बायकोवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नवऱ्याने हे टोकाचं पाऊल उचलून बायकोवर जीवघेणा हल्ला का केला, याबाबतही आता धक्कादायक खुलासा पोलिसांच्या तपासातून समोर आलाय.
घरगुती वादातून नवऱ्याने बायकोवर ऍसिड फेकल्याचं समोर आलं आहे. ही घटना रांचीमधील नामकु येथील लोवाडीह या भागात घडली. ऍसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव आमीर असून त्याच्या पत्नीचं हिना आहे.
हिनाच्या नातलगांनी दिलेल्या माहितीनुसार, ती सकाळी आपला चेहरा धुवत होती. त्यावेळी अचानक तिथं आमीर आला आणि त्यानेतर एक स्टिलच्या जगमध्ये ठेवलेलं ऍसिड हिनाच्या चेहऱ्यावर फेकलं. यानंतर तो तिथून पळून गेला.
चेहऱ्यावर ऍसिडने हल्ला झाल्यानंतर बिथरलेली हिना जोरजोराने ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तातडीने मदतीसाठी आणि त्यांनी तिला रुग्णालात दाखल केलं.
आमीर आणि हिना यांच्या लग्नाला 10 वर्ष झाली आहे. त्यांना दोन मुलं आहोत. लग्नानंतर त्यांचा संसार सुखात सुरु होता. पण नंतर काही दिवसांनी त्यांच्या संसाराला गालबोट लागला.
आरोपी आमीर हा दारु पिऊन हिनाला मारहाण करायचा. तिच्याकडे सारखा पैशांची मागणी करायता. ही गोष्ट एक दिवस घटस्फोटापर्यंत येऊन पोहोचली. पण कुटुंबीयांनी अखेर हे प्रकरण मिटवलं होतं.
आमीर हा एक मोबाईल रिपेअरिंगचं दुकान चालवतं. नेहमी पैसे मागून तो हिनाचा छळ करायचा. हिना जेव्हा जेव्हा माहेरी यायची, तेव्हा तेव्हा ती पाच ते दहा हजार रुपये घेऊन पुन्हा सासरी परतायची, अशी माहिती समोर आलीय.
सध्या हिना गंभीररीत्या जखमी आहे. ऍसिड हल्ल्यात ती प्रचंड भाजली गेली आहे. या संपूर्ण प्रकाराची पोलिसांनी नोंद घेतली असून आता पुढील तपास केला जातो आहे. पोलिसांनी हिना आणि तिच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदवलेत. फरार आरोपी आमीर याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनीही तपास सुरु केलाय.